कर्मचारी पॉझिटिव्ह, महाराष्ट्र बँक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 19:04 IST2021-04-13T19:02:45+5:302021-04-13T19:04:12+5:30
त्र्यंबकेश्वर : गेले दोन-तीन दिवस बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील व्यवस्थापक, लेखापाल, रोखपाल, दोन महिला क्लर्क, शिपाई असा स्टाफ पॉझिटिव्ह झाल्याने शाखा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कर्मचारी पॉझिटिव्ह, महाराष्ट्र बँक बंद
ठळक मुद्देबँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील स्टाफ पॉझिटिव्ह
त्र्यंबकेश्वर : गेले दोन-तीन दिवस बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील व्यवस्थापक, लेखापाल, रोखपाल, दोन महिला क्लर्क, शिपाई असा स्टाफ पॉझिटिव्ह झाल्याने शाखा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याबाबत वरिष्ठांकडे नाशिक येथे कळविले असता उपविभागीय कार्यालयाने सोमवारी शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवार असूनही अनेक शहरी व ग्रामीण खातेदारांचे व्यवहार झाले नाहीत.