आंबोली फाटा ते वाघेरा रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 07:55 PM2019-07-30T19:55:26+5:302019-07-30T19:55:46+5:30

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल सारख्या ग्रामीण भागातून नव्हे तर गुजरात राज्यातील त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक त्र्यंबकेश्वरला येत असतात, तीर्थक्षेत्र तसेच हे तालुक्याचे ठिकाण असल्याने त्र्यंबकेश्वर ते वाघेरा हा रस्ता नागरिकांचा व भाविकांचा वर्दळीचा रस्ता आहे. मात्र या दहा किमी अंतरराच्या रस्त्याची दयनीय दुरवस्था झाल्याने रस्ता खड्डेमय बनला आहे.

Empire of rocks on the roads of Amboli Fata to Vaghera | आंबोली फाटा ते वाघेरा रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य

आंबोली फाटा ते वाघेरा रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य

Next
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : बांधकाम विभागाची मलमपट्टी पावसाळ्यात उखडली

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल सारख्या ग्रामीण भागातून नव्हे तर गुजरात राज्यातील त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक त्र्यंबकेश्वरला येत असतात, तीर्थक्षेत्र तसेच हे तालुक्याचे ठिकाण असल्याने त्र्यंबकेश्वर ते वाघेरा हा रस्ता नागरिकांचा व भाविकांचा वर्दळीचा रस्ता आहे. मात्र या दहा किमी अंतरराच्या रस्त्याची दयनीय दुरवस्था झाल्याने रस्ता खड्डेमय बनला आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली फाटा ते वाघेरा रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने तेथील रस्त्याचालणे देखिल मुस्किल होत आहे. दळणवळणाच्या दृष्टीने हरसूल भागातुन तालुक्याला जोडणारा एकमेव पर्यायी रस्ता आहे. जेमतेम दहा किमी अंतर पार करताना वाहनधारकास तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
मागील दोन वर्षापूर्वी रस्ता झाला परंतु त्याच वर्षात पावसाळ्यात रस्ता खराब झाला त्यानंतर सहा महिन्यात डागडुजी झाली, परंतु रस्त्याची परिस्थिती जैसे थे असल्याने प्रवाश्यांसह नागरिकांनी संताप व्यक्त केला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामूळे दोन वर्षा पूर्वी केलेल्या रस्त्याला, रस्ता झाल्यापासून सहा महिन्यांतच खड्डे पडायला सुरु वात झाली. त्यानंतर खड्डे भरण्याचे काम चालूच झाले, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर शंका येत असल्याचे मत नागरीकांनी व्यक्त केले.
यावर्षी काही भागात रस्त्याची डागडुजी केली होती. मात्र जोरदार पावसामुळे डागडुजीचे खड्यात रूपांतर झाले. ही बांधकाम विभागाचे मलमपट्टी वाहनधारक व प्रवाशांची जीवघेणी ठरली आहे. बिकट तिच विहवाट म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यातील वेळुंजे ते वाघेरा रस्ता अतिशय खराब झाला आहे.
प्रवाश्यांना रस्त्यातून मार्ग काढणे जिकरीचे बनते, काही वेळा दुचाकीस्वरांचे अपघात ही होत असतात, तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची झालेली दुरवस्था थांबवावी अशी मागणी स्थानिकांकडून येत आहे.
रस्त्याने दूध व्यवसाहिक मोठया प्रमाणात ये जा करत असतात , पण खड्यामुळे कित्येक दूधवाले ह्या खड्यातुन जात असताना पडत असतात व दुध सांडून वाया जात गेले आहे , त्यामुळे दूध व्यवसाहिकाना मोठा फटका बसत आहे , त्यामुळे त्यांचातही नाराजी आहे,
१) हरसूल सारख्या ग्रामीण भागातील नागरिकांची तालुक्याशी दळणवळणाच्या दृष्टीने जोडणारा आंबोली फाटा ते वाघेरा हा महत्वाचा रस्ता आहे.दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या मलमपट्टीचे पाण्यात रूपांतर झाल्याने रस्ता पूर्णत: खडेमय झाला आहे.रस्त्याची तात्काळ खडे भरून घ्यावे.
- शरद महाले, स्थानिक ग्रामस्थ गोरठाण.
२) रस्ता झाल्यापासून त्याचे कोणतेही आवश्य असे काम करण्यात आले नाही,
दरवर्षी प्रमाणे थोडी मलम पट्टी करून तोंडाला पाने पुसली जातात , माघील दोन वर्षांपूर्वी झालेला रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला आहे , सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेची आहे .
- समाधान बोडकेपाटील, शिवसेना तालुका समनव्यक,
३) या रस्त्यांवर अपघात होतील असे चित्र आहे,
ह्या खड्यातून रस्ता काढणे मुश्कील आहे, वेळुंजे ते गोरठाण रस्त्यावर डांबर शोधून सापडणार नाही, अशी परिस्थिती आहे , रस्ता झाल्या पासून सहा मिहन्यात हा रस्ता खराब झाला आहे , तेव्हा पासून बाकी रस्त्याला डागडुजी केली परंतु वेळुंजे ते गोरठाण हा रस्ता तसाच ठेवला म्हणून अशी परिस्थिती आहे.
- तानाजी कड, अंबोली ग्रामस्थ.
४) या ठिकाणी दुचाकी स्वरांचा कायम अपघात होतात, खड्यातून रस्ता काढत असताना ते गाडी खड्यात घेऊन पडतात, व जखमी होत असतात, याकडे लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून मोठी अघिटत घटना घडू नये, आम्ही दूध घेऊन जात असताना कित्येकदा दूध सांडून नुकसान झाले,
- हरिदास भडांगे, दूध व्यवसाहिक गोरठाण.
5) या रस्त्यावर दररोज ये जा करत असताना खूप त्रास होतो , गाडी काढत असताना खड्यात आदळत असते , गाडीत प्रवाशी असतात त्यामुळे गाडी खूप सावकाश चालवावी लागते , टायर लवकर खराब होत असतात, रस्ता झाला पाहिजे,
- शंकर खोटरे, टॅक्सी चालक.
6) गाडी चालवत असताना या खड्यातुन मार्ग काढावा लागतो , पाठीचा त्रास होण्याची चिन्ह दिसतात, गाडी खड्यात आदळल्याने पाठी वर ताण येतो,
खूप त्रास होतो, पण दररोज चे काम व रोजीरोटी चा प्रश्न असतो त्यामुळे करावे लागतात, व गाडीचे खूप नुकसान होते,
- भीमा उघडे, टॅक्सी चालक.
7) पर्यायी गुजरात म्हणून हा रस्ता हा महत्वाचा आहे, या मार्गे गुजरात हद्द अगदीच जवळ असल्याने लोकांची ये-जा असतेच, पण हा रस्ता कायमच चर्चेत आहे, काम होतानाच निकृष्ट दर्जाचे झाले होते, ठेकेदारावर वचक राहिला नाही, ठेकेदार मनमानी करत असतात, हाच रस्ता होतो आण ित्याच वर्षातील पावसाळ्यात खराब होतो, ही जबादारी कोणाची?
- कैलास बोडके ग्रामस्थ वेळुंजे.

Web Title: Empire of rocks on the roads of Amboli Fata to Vaghera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.