शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

गोदाकाठ परिसरात कांदा साठवणुकीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 19:05 IST

चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात उन्हाळ कांदा साठवणुकीकरिता शेतकरी धावपळ करीत आहेत. सध्या गोदाकाठ भागात कांदा चांगला पिकला आहे. गेल्या वर्षभरापासून गारपीट, अवकाळी पाऊस या संकटावर मात करुन कसाबसा कांदा पिकवला आणि हाच कांदा आता बाजारात आठशे ते अकराशे भावात विकला जातो आहे. त्यामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. कांद्याचे चांगले उत्पादन मिळाले असून बाजारभाव मिळत नसल्याने कांदा साठवणूक केल्याशिवाय पर्याय नाही.

ठळक मुद्देकांदा साठवणूक केल्याशिवाय पर्याय नाही.

चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात उन्हाळ कांदा साठवणुकीकरिता शेतकरी धावपळ करीत आहेत. सध्या गोदाकाठ भागात कांदा चांगला पिकला आहे. गेल्या वर्षभरापासून गारपीट, अवकाळी पाऊस या संकटावर मात करुन कसाबसा कांदा पिकवला आणि हाच कांदा आता बाजारात आठशे ते अकराशे भावात विकला जातो आहे. त्यामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. कांद्याचे चांगले उत्पादन मिळाले असून बाजारभाव मिळत नसल्याने कांदा साठवणूक केल्याशिवाय पर्याय नाही.गेल्यावर्षी उन्हाळी कांद्याचे भरपूर प्रमाणात उत्पादन झाल्याने तेव्हा कांदा काढणीच्या वेळेस आज ज्या भावात कांदा विकला जात आहे. त्याच भावात गेल्यावर्षी विकला जात होता, तेव्हा पुढे भाववाढ होईल या आशेवर शेतकऱ्याने चाळीत कांदा साठवणूक केली होती. परंतु पूर्ण वर्षभर कांद्याच्या भावात वाढ झाली नाही. कांद्याच्या भावात वाढ होईल या आशेवर नोव्हेंबर महिन्यापर्यंत ठेवला परंतु भाव वाढला नाही. तेव्हा कांदा चाळीत सडला. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली. हा कांदा चाळीतून काढून उकिरड्यावर फेकावा लागला. तरीही या वर्षी मोठ्या हिमतीने शेतकऱ्याने कांद्याची लागवड केली आहे. या कांदापिकासाठी उधार, उसनवार पैसे आणून उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. परंतु पाहिजे तसा भाव नसल्याने तो चाळीत ठेवत आहेत.यावर्षी चांगल्या वातावरणामुळे अल्पसा पाऊस असूनही शेतकरी वर्गाला कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर साधले आहे. मात्र उत्पादन खर्च १५०० रुपये एकरी असताना कांद्याला मिळत असलेल्या सरासरी ८०० ते ११०० बाजारभावामुळे शेतकरी वर्ग कांदा साठवणुकीस जोर देऊ लागला आहे. मातीमोल दरात कांदा देण्यापेक्षा शेतकरी साठवण करण्यास अधिक पसंती देत असल्याने सध्या गोदाकाठ परिसरात कांदा साठवणूक करतानाचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.निफाड तालुक्यातील बहुतांश सर्वच गावात कांदा लागवड केली जाते. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात कांद्याला चांगलाच भाव मिळाला होता व बाजारमध्ये त्याचा तुटवडादेखील निर्माण झाला होता. तेव्हा उच्चांकी १२००० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव होता; मात्र सध्या भाव कमी असल्याने शेतकरी कांदा साठवणुकीवर भर देत आहे. दरवर्षी सर्वसाधारण शेतकरी दोनशे ते तीनशे क्विंटल कांद्याची चाळीत साठवणूक करीत होता.यावर्षी कांदा पिकास पोषक वातावरण असल्याने शेतकरी वर्गास अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न साधल्याने साठवणुकीच्या क्षमतेपेक्षा अधिक उत्पन्न मिळाल्याने तसेच सध्या कांद्यास सरासरी सातशे ते हजार रुपयापर्यंत बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी कांदा साठवणुकीवर भर देऊ लागला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीसाठी कायमस्वरूपी केलेल्या सोयी कांदा चाळी भरून गेल्याने अनेक परिसरात तात्पुरते कुड व अन्य सोयी उभारून कांदा साठविण्याची तयारी करीत आहे.कांद्याला उत्पादन १५०० ते १७०० रुपये एकरी खर्च येतो आणि सध्या कांदा बाजारभाव ८०० ते ११०० च्या दरम्यान असल्याने उत्पादन खर्च निघत नसल्याने कांदा साठवणुकीवर भर दिला जात आहे.- कैलास हांडगे, शेतकरी, चाटोरी. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा