मुंबई-आग्रा महामार्गावरील आपत्कालीन सुविधा शोभेपुरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:25 IST2018-03-26T00:25:44+5:302018-03-26T00:25:44+5:30

मुंबई-आग्रा महामार्गावरील आपत्कालीन स्थितीमध्ये रात्री-अपरात्री महामार्गावर अडचणीच्या वेळी मदत मिळावी या हेतूने ठरावीक अंतरावर एस.ओ.एस. सुविधा बसविण्यात आली आहे. त्यावरील कॉल बटण प्रेस करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या असल्या तरी अजूनही ही सेवा कार्यान्वित नसल्याने फक्त शोभेपुरती ती बसविण्यात आली आहे का, असा प्रश्न प्रवासी व वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.

  For emergency facilities on the Mumbai-Agra highway | मुंबई-आग्रा महामार्गावरील आपत्कालीन सुविधा शोभेपुरती

मुंबई-आग्रा महामार्गावरील आपत्कालीन सुविधा शोभेपुरती

आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील आपत्कालीन स्थितीमध्ये रात्री-अपरात्री महामार्गावर अडचणीच्या वेळी मदत मिळावी या हेतूने ठरावीक अंतरावर एस.ओ.एस. सुविधा बसविण्यात आली आहे. त्यावरील कॉल बटण प्रेस करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या असल्या तरी अजूनही ही सेवा कार्यान्वित नसल्याने फक्त शोभेपुरती ती बसविण्यात आली आहे का, असा प्रश्न प्रवासी व वाहनधारकांनी उपस्थित केला आहे. महामार्गावर परदेशातील संपर्क यंत्रणेसारखी एस.ओ.एस. ही अत्यावश्यक सुविधा ठरावीक अंतरावर उपलब्ध करून दिलेली आहे. पण एकंदरीत ही यंत्रणा रस्त्यावर शोभेपुरती बसविलेली दिसते. मुंबई-आग्रा जलदगती महामार्गावर काही वाहनचालकांना अडचण निर्माण झाल्यास संपर्क साधण्यासाठी अत्यावश्यक सुविधा तातडीने उपलब्ध होण्यासाठी महामार्गावर ही फोन सुविधा ठराविक अंतरावर उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु सेवा अजूनही सुरू झालीच नसल्याचे वाहनधारक सांगतात. या सुविधेचा फायदा सर्व वाहनधारकांना कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी हायवेवरून नेहमी प्रवास करणाऱ्या वाहन धारकांनी केली आहे.  तसेच हायवेलगत काही किलोमीटरच्या आतमध्ये असलेले स्वच्छतागृह दिसत नाहीत. त्यामुळे वाहनधारकांची विशेष करून महिलांची मोठी कुचंबणा होते. त्यामुळे प्रशासनानेदेखील योग्य ती दखल घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे. गरजेच्या ठिकाणी
निवारा शेड उभारावे
महामार्गाच्या दुतर्फा प्रवाशांच्या संरक्षणासाठी निवारा शेड फक्त ठरावीक ठिकाणी उभारण्यात आले आहेत. त्यातील काही निवारा शेडची दुरवस्था झालेली आहे. शिवाय बºयाच ठिकाणी निवारा शेड रस्त्याच्या एकाच बाजूने बसवलेले आहे. दुसºया बाजूने देखील प्रवासी असतात याचा विचार करून गरजेच्या ठिकाणी निवारा शेड उभारण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थी व प्रवाशांनी केली आहे.

Web Title:   For emergency facilities on the Mumbai-Agra highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.