मुंबईला होणारा पाणीपुरवठा रोखण्यासाठी वैतरणा धरणावर एल्गार कष्टकरी संघटनेचे आंदोलन

By प्रसाद गो.जोशी | Updated: May 1, 2025 22:59 IST2025-05-01T22:47:10+5:302025-05-01T22:59:39+5:30

अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले

Elgar Workers Association protest at Vaitarna Dam to stop water supply to Mumbai | मुंबईला होणारा पाणीपुरवठा रोखण्यासाठी वैतरणा धरणावर एल्गार कष्टकरी संघटनेचे आंदोलन

मुंबईला होणारा पाणीपुरवठा रोखण्यासाठी वैतरणा धरणावर एल्गार कष्टकरी संघटनेचे आंदोलन

गणेश घाटकर

लोकमत न्यूज नेटवर्क, इगतपुरी: इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणावर आज एक मोठे आंदोलन पाहायला मिळाले. मुंबईला होणारा पाणीपुरवठा रोखण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेचे भगवान मधे व पदाधिकारी आणि महिला पदाधिकाऱ्यांनी धरण परिसरात जोरदार आंदोलन छेडले. महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असलेले हे आंदोलन अचानक तीव्र झाले. संघटनेच्या महिला आणि कार्यकर्त्यांनी थेट वैतरणा धरणाच्या मुंबईकडे जाणाऱ्या कॅनाॅलमध्ये उड्या मारल्या. हा प्रकार घडताच जलसंपदा विभागाने तत्काळ कॅनाॅलमधून मुंबईकडे जाणारा पाणीपुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Elgar Workers Association protest at Vaitarna Dam to stop water supply to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.