अकरा वर्षांनी झाली नांदगावची आमसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:01 AM2020-01-31T00:01:54+5:302020-01-31T00:40:49+5:30

तब्बल ११ वर्षांनी नांदगावची आमसभा झाल्याने समस्याग्रस्त नागरिकांच्या संतापाची कोंडी फुटली आणि नागरिकांच्या आरोपांना उत्तरे देताना अधिकारीवर्गाची पुरती भंबेरी उडाली. गडबडलेल्या अधिकारी वर्गाची अनेकदा कानउघाडणी करण्याची वेळ आमदार सुहास कांदे यांचेवर आली. पंचायत समितीच्या नोंदीनुसार ७ फेब्रुवारी २००८ रोजी शेवटची आमसभा घेण्यात आली होती.

Eleven years after Nandgaon's general assembly | अकरा वर्षांनी झाली नांदगावची आमसभा

नांदगाव येथील आमसभेप्रसंगी आमदार सुहास कांदे व अन्य पदाधिकारी.

Next
ठळक मुद्देतक्रारींचा पाऊस : उत्तरे देताना अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी

नांदगाव : तब्बल ११ वर्षांनी नांदगावची आमसभा झाल्याने समस्याग्रस्त नागरिकांच्या संतापाची कोंडी फुटली आणि नागरिकांच्या आरोपांना उत्तरे देताना अधिकारीवर्गाची पुरती भंबेरी उडाली. गडबडलेल्या अधिकारी वर्गाची अनेकदा कानउघाडणी करण्याची वेळ आमदार सुहास कांदे यांचेवर आली. पंचायत समितीच्या नोंदीनुसार ७ फेब्रुवारी २००८ रोजी शेवटची आमसभा घेण्यात आली होती.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन तालुक्याच्या रथाची दोन चाके आहेत. जनतेच्या हितासाठी या दोन चाकांनी नेहमी सजग राहिले पाहिजे. जनतेला त्रास झाल्यास गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा आमदार सुहास कांदे यांनी आमसभेत नांदगाव व मालेगाव तालुक्यातील प्रशासनाला दिला. या आमसभेत नांदगाव व मालेगाव तालुक्यातील मात्र नांदगाव विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्यावरील अन्यायास वाचा फोडली.
यावेळी विविध शासकीय व निमशासकीय खात्यांचा आढावा आमसभेत घेण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाकडून माणिकपुंज गावासाठी सुमारे २ कोटी रु पयांचा निधी मंजूर असून ; आतापर्यंत फक्त ५३ लाख रुपयेच खर्च झाल्याची बाब साईनाथ रामकर यांनी उपस्थित करत योजनेअंतर्गत मिळालेले एलईडी बल्ब अधिकाºयांनी विकले असल्याचा आरोप केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यशवंत पाटील यांनी एकूण १२ रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे, मात्र सदर ठेकेदार काम सुरू करत नसल्याची बाब स्पष्ट केल्यानंतर आमदार कांदे यांनी सदर ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची सूचना केली. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न अनेकांनी मांडला. कांदाचाळी ऐवजी शेततळ्यांना प्राधान्य देण्याची मागणी शेतकºयांनी यावेळी केली. भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणीच्या कामात दिरंगाई होत असल्याचा मुद्दा ही चांगलाच गाजला. वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराबाबत मुद्दा समोर आला. नांदगाव, मनमाड नगरपालिका प्रशासनाच्या कामकाजाबाबत झालेल्या तक्र ारींना नगराध्यक्ष राजेश कवडे, मनमाडचे मुख्याधिकारी डॉ.दिलीप मेनकर यांनी उत्तरे दिली. यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, नगराध्यक्ष राजेश कवडे, गणेश धात्रक, बाजार समितीचे सभापती तेज कवडे, किशोर लहाने, संजय सांगळे, पंचायत समिती सभापती भाऊसाहेब हिरे, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे,पंचायत समिती सदस्य सुमन निकम, अर्चना वाघ, विद्या पाटील, उपसभापती सुशीला नाईकवाडे, आदी उपस्थित होते.

वनविभागावर आरोप
तालुका वनविभाग भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचा आरोप खुद्द आमदार कांदे यांनीच केला तर एकीकडे लाखो रोपे वनविभागाने वाटली असल्याचा वनक्षेत्रपाल बोरसे यांचा दावा सामाजिक संस्थांनी खोडून काढला.
वनपाल सोनवणे यांना हरणांनी नुकसान केलेल्या प्रकरणात दुर्लक्ष केल्याचा आरोप व वाळूच्या
प्रकरणात निलंबित करावे अशी सुचना कांदे यांनी
दिली.

Web Title: Eleven years after Nandgaon's general assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.