शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या नाशकात अकरा ‘मौल्यवान गणेश’

By admin | Updated: September 4, 2016 01:17 IST

तयारी पूर्ण : शहरात ८५ मोठी गणेश मंडळे

 नाशिक : गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर आला असून, बहुतांश मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे. शहरात एकूण ८५ मोठी मंडळे असून, जुने नाशिक भागात अकरा मंडळांच्या गणेश मूर्तींचा मौल्यवान गटात समावेश होतो.सोमवारी (दि.५) गणरायाचे आगमन होत असून, गणरायाच्या स्वागतासाठी अवघे शहर सज्ज झाले आहे. आगामी महापालिका निवडणुकांचा रंग गणेशोत्सवासह येणाऱ्या पुढील सणांमध्ये पहावयास मिळणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणेश मंडळांच्या संख्येतही वाढ झाली आहे. भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, गंगापूर, इंदिरानगर अशा सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राजकीय पक्षांशी संबंधित पदाधिकाऱ्यांची गणेशोत्सव मंडळे आहेत. शहरातील जवळपास सर्वच गणेशोत्सव मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजली आहे. आराससाठी लागणारे विविध साहित्य विक्रीची दुकाने थाटली आहेत. दुकानांवर सजावटीचे साहित्य घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. एकूणच संपूर्ण बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण बघावयास मिळत आहे. रोषणाईच्या माळा, फुलांच्या माळांना मागणी वाढली आहे. पर्यावरणपूरक आरास करण्यावरही नागरिक भर देत आहेत. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान, इदगाह मैदानाकडे नागरिकांची व विविध गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची पावले वळू लागली आहेत. बाजारात गणरायांची नानाविध रूपे बघावयास मिळत आहे. आकर्षक रंगकाम, आकारानुसार गणेशमूर्तींच्या किमती अवलंबून आहेत. बहुसंख्य मंडळांनी मोठ्या मूर्तींची आगाऊ नोंदणी शहराबाहेरील कारागिरांकडे करून ठेवली आहे. गणरायाचे वाजतगाजत स्वागत करण्यासाठी सर्वच ढोलपथके सज्ज झाली आहेत. खासगी ढोलवाल्यांकडेही बाप्पांच्या आगमन मिरवणुकीच्या बुकिंग आल्या आहेत.फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप या सोशल साईट्स्वरही बाप्पांचे आगमन जोरात सुरू आहे. (प्रतिनिधी)