येवल्यात अकरा नवीन बाधित; एक रुग्ण मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 01:18 IST2021-10-08T01:18:07+5:302021-10-08T01:18:57+5:30
येवला शहरासह तालुक्यातील अकरा संशयितांचे कोरोना अहवाल गुरुवारी (दि.७) पॉझिटिव्ह आले, तर एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

येवल्यात अकरा नवीन बाधित; एक रुग्ण मृत्युमुखी
येवला : शहरासह तालुक्यातील अकरा संशयितांचे कोरोना अहवाल गुरुवारी (दि.७) पॉझिटिव्ह आले, तर एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.
बाधितांमध्ये शहरातील चौघांचा, तर ग्रामीण भागातील सात बाधितांचा समावेश आहे. तालुक्यात आजपर्यंत २८९ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ६१०४ झाली असून, यापैकी ५७२७ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत, तर सद्य:स्थितीत बाधित रुग्ण संख्या ८७ इतकी आहे.