शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

अकरावी प्रवेशाच्या माहिती पुस्तिकांची छपाई पूर्ण -31 मे पर्यंत विद्यार्थ्यांना होणार उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 2:51 PM

शिक्षण उपसंचालक कार्यालयाला बालभारतीकडून अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिका मिळण्यास सुरुवात झाली अशून रविवारी (दि.१६) दुपारपर्यंत सुमारे ८ हजार पुस्तिका उपसंचालक कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. आरक्षण तक्ता तयार करण्याच्या कामातील विलंबामुळे  अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेचे कामही खडले होते. परंतु हा संभ्रम दूर झाल्यानंतर माहिती पुस्तिकांच्या छपाईचे काम जवळपास पूर्ण झाले असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा प्रथम भाग भरण्यासाठी माहिती पुस्तिका उपलब्ध होऊ शकणार आहे. 

ठळक मुद्देअकरावीची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार शिक्षण उपसंचालक कार्यालयास माहिती पुस्तिका प्राप्त निकालापूर्वीच ऑनलाईन अर्जाचा भाग एक भरता येणार

नाशिक : आर्थिक मागास प्रवर्गाचे १० टक्के  आरक्षण आणि मराठा समाजाला मिळालेले १६ आरक्षणा यामुळे आरक्षण तक्ता तयार करण्यास झालेल्या विलंबामुळे लांबलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया मे महिन्यांच्या अखेरपर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाला बालभारतीकडून अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिका मिळण्यास सुरुवात झाली अशून रविवारी (दि.१६) दुपारपर्यंत सुमारे ८ हजार पुस्तिका उपसंचालक कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. आरक्षण तक्ता तयार करण्याच्या कामातील विलंबामुळे  अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेचे कामही खडले होते. परंतु हा संभ्रम दूर झाल्यानंतर माहिती पुस्तिकांच्या छपाईचे काम जवळपास पूर्ण झाले असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा प्रथम भाग भरण्यासाठी माहिती पुस्तिका उपलब्ध होऊ शकणार आहे. नाशिक महापालिका परिसरात गेल्या वर्षी विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी २० एप्रिलपासून आॅनलाइन प्रक्रियेस सुरुवात झाली होती, तर १० मेपासून विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिकांचे वितरण सुरू झाले होते. परंतु यंदा मे महिन्याचा शेवटच्या सप्ताहापर्यंत दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी प्रतीक्षा करावी लागली असून आता शिक्षण उपसंचालक कार्यालयास माहिती पुस्तिका प्राप्त झाल्याने विद्यार्थी व पालकांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने बालभारतीकडून सुमारे ३० हजार माहिती पुस्तिकांची मागणी केली होती. त्यापैकी आठ हजार पुस्तिका रविवारी दुपारपर्यंत  शिक्षण उपसंचालक कार्यालयास प्राप्त झाल्या असून सायंकाळपर्यंत सर्व पुस्तिका प्राप्त झाल्यानंतर पुढील दोन दिवसांत शहरातील माध्यमिक शळांमध्ये या माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकणार आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीSchoolशाळाcollegeमहाविद्यालय