व्हेंटिलेटरवर असलेले  15 पैकी 11 रूग्ण दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 02:11 AM2021-04-22T02:11:44+5:302021-04-22T02:12:12+5:30

शहरात कोरोनाबाधितांना उपचारासाठी बेड मिळणे कठीण असताना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील रूग्णांना बेड मिळाले, चाैदा जणांना ऑक्सिजनही मिळाला पण दुर्दैवाने हेच जीववर बेतले. ऑक्सिजन गळतीची दुर्घटना घडल्यानंतर रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने धावपळ केली, परंतु व्हेंटिलेटरवरील १५ पैकी ११ रूग्णांचा मृत्यू झाला.

Eleven of the 15 patients on the ventilator succumbed | व्हेंटिलेटरवर असलेले  15 पैकी 11 रूग्ण दगावले

व्हेंटिलेटरवर असलेले  15 पैकी 11 रूग्ण दगावले

Next
ठळक मुद्देकाळाचा घाला : बेड, ऑक्सिजन मिळाले पण जीव वाचला नाही

नाशिक :  शहरात कोरोनाबाधितांना उपचारासाठी बेड मिळणे कठीण असताना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील रूग्णांना बेड मिळाले, चाैदा जणांना ऑक्सिजनही मिळाला पण दुर्दैवाने हेच जीववर बेतले. ऑक्सिजन गळतीची दुर्घटना घडल्यानंतर रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने धावपळ केली, परंतु व्हेंटिलेटरवरील १५ पैकी ११ रूग्णांचा मृत्यू झाला.
नाशिक महापालिकेचे डॉ. झाकीर हुसेन हे वर्षभरापासूनच कोविड रूग्णालय म्हणून राखीव ठेवण्यात आले होते. या रूग्णालयात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचे बेड असल्याने नेहमीच वेटिंग असते. महापालिकेच्या बिटको आणि झाकीर हुसेन या रूग्णालयांवर कायम ताण असतो. या दोन्ही रूग्णालयात नाशिकच नव्हे तर अन्य जिल्ह्यातील रूग्ण येत असतात.
रूग्णालयातील घटनेने कर्मचारी अस्वस्थ
नाशिक :  गोरगरिबांच्या सेवेसाठी म्हणून नाशिकचे डॉ. झाकीर हुसेन रूग्णालय परिचित आहे. सध्या ते महापालिकेचे कोविड रूग्णालय म्हणून परिचित आहे. या रूग्णालयात वर्षभरात गरीब आणि गरजवंत रूग्ण बरे झाले आहेत. डॉक्टर आणि कर्मचारी जोखीम पत्करून काम करीत आहेत. मात्र, अशा प्रकारच्या अधून मधून होणाऱ्या दुर्घटना अथवा अप्रिय प्रसंग तक्रारींमुळे चांगल्या कार्यास, लौकिकास गालबोट लागल्याने वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.  देखभाल दुरूस्तीची जबाबदारी पूर्णत: ठेकेदार कंपनीकडे होती, मात्र, चर्चा महापालिकेच्या दुर्लक्षाविषयी झाल्याने अस्वस्थता पसरली आहे.
६३ रुग्ण होेते गंभीर 
 महापालिकेच्या या डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात १५० बेडची क्षमता असताना १५७ रूग्ण दाखल होते. त्यातील १३१ रूग्णांना ऑक्सिजन लावावा लागला होता तर १४ रूग्ण व्हेंटिलेटरवर होते. या रूग्णालयात दाखल ६३ रूग्ण गंभीर होते. मात्र, ऑक्सिजन गळतीची दुर्घटना झाल्यानंतर एकच हलकल्लोळ झाला. महापालिकेच्या कर्मचारी आणि रूग्णांच्या नातेवाईकांनी बरीच धावपळ करून रूग्ण वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र, तरीही २२ जणांचा बळी गेला. यात व्हेंटिलेटरवरील १५ पैकी ११ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

Web Title: Eleven of the 15 patients on the ventilator succumbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.