शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

मेनरोडवर ऐन गर्दीत विद्युत तारा कोसळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 2:05 AM

शहरातील गजबजलेल्या मेनरोडवर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एकाचवेळी अनेक विद्युत खांबांवर शॉर्टसर्किट होऊन प्रवाहित तार पडल्याने नागरिकांसह दुकानदारांचीही चांगलीच धावपळ झाली. नागरिक जिवाच्या भीतीने सैरावैरा पळत सुटले, तर महिला आणि मुलांची आरडाओरड झाल्याने घबराट निर्माण झाली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

ठळक मुद्देदुर्घटना टळली : एकाचवेळी अनेक खांबांवर शॉर्टसर्किट; एका दुकानाला आग

नाशिक : शहरातील गजबजलेल्या मेनरोडवर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एकाचवेळी अनेक विद्युत खांबांवर शॉर्टसर्किट होऊन प्रवाहित तार पडल्याने नागरिकांसह दुकानदारांचीही चांगलीच धावपळ झाली. नागरिक जिवाच्या भीतीने सैरावैरा पळत सुटले, तर महिला आणि मुलांची आरडाओरड झाल्याने घबराट निर्माण झाली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी या घटनेत मात्र एका दुकानाच्या नामफलकाला आग लागून किरकोळ नुकसान झाले. दरम्यान, शॉर्टसर्किटनंतर मेनरोडवरील वीजपुरवठा सुमारे दोन तास खंडित झाला होता.सध्या दिवाळीच्या खरेदीसाठी मेनरोडवर ग्राहकांची गर्दी होत आहे. रविवारचा दिवस असल्याने तर सकाळपासूनच मेनरोडवर ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. नेहमीप्रमाणे मेनरोड गजबजलेला असतानाच सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास येथील गाडगे महाराज पुतळ्यापासून जवळच असलेल्या शिवाजीरोड कॉर्नवरील एका विद्युत खांबावर शॉर्टसर्किट होऊन विद्युत तारा जमिनीवर कोसळल्या, तर एका दुकानाच्या नामफलकालाही आग लागली. त्यानंतर काहीवेळाच्या अंतराने जवळच असलेल्या अनेक खांबांवर एकामागोमाग एक शॉर्टसर्किट झाल्याने ग्राहकांची धावपळ उडाली.विद्युततारा जमिनीवर पडल्याची चर्चा पसरल्याने संपूर्ण मेनरोडवर एकच गोंधळ उडाला.महिला आणि लहान मुलांची आरडोओरड झाल्याने गोंधळात अधिकच भर पडली.घटनेनंतर उडालेला गोंधळ लक्षात घेता येथील काही कार्यकर्त्यांनी लागलीच नागरिकांना शांततेचे आवाहन करीत या मार्गावरील संपूर्ण वाहतूक थांबविली. घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी दुकानाची आग विझविली. त्यापाठोपाठ पोलीसही दाखल झाल्याने त्यांन नागरिकांना शांततेचे आवाहन केले. घटनास्थळी दाखल झालेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षितेच्या कारणास्तवर या परिसरातील वीजपुरवठा खंडित केला. यामुळे मेनरोडसह महात्मा गांधीरोड, शालिमार चौक परिसर अंधारात होता. महावितरणकडून तत्काळ दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले, मात्र रात्री नऊ वाजेपर्यंतही वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता.मोठी दुर्घटना टळलीप्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार एका विद्युत खांबावर मोठ्या प्रमाणात शॉर्टसर्किट झाल्यानंतर येथील अनेक ठिकाणच्या खांबावर आगीच्या ठिणग्या उडल्याने सर्वत्र धावपळ झाली. गर्दी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. महिला आणि लहान मुलांच्या रडण्याच्या आवाजामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली. परंतु परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी गर्दीच्या ठिकाणीही परिस्थितीवर नियंत्रण मिळवत नागरिकांना दिलासा दिला आणि पोलिसांनाही पाचारण केले.राजेबहाद्दर फिडरचा कंडक्टर तुटलामेनरोडसह, शिवाजीरोड, एमजीरोड परिसराला वीजपुरवठा करणाºया राजेबहाद्दर फिडरवरील लघुदाब वाहिनीचा कंडक्टर तुटल्यामुळे इतर खांबावरदेखील शॉर्टसर्किट झाला असावा, असे महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले. या फिडरवर मोठ्या प्रमाणात वाणिज्यक आणि घरगुतीदेखील ग्राहक असून, कंडक्टर तुटल्यामुळे या संपूर्ण परिसरात अंधार पसरलाच शिवाय खांबावर आगीच्या ठिणग्या उडाल्यामुळे मोठा अनर्थ होता होता टळला. महावितरणकडून वीज सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी पोहचलेल्या महावितरणच्या अधिकारी, कर्मचाºयांवर येथील दुकानदार आणि नागरिकांनी आरोप करीत विद्युत वाहिन्या आणि खांबाबाबत वारंवार तक्रारी करूनही दुुर्लक्ष केल्यामुळेच घटना घडल्याचा आरोप केला.तीन विद्युत खांबांवरशॉर्टसर्किटएका खांबावर आगीच्या ठिणग्या उडत असताना लागलीच एकामोगोमाग दोन खांबांवर असाच प्रकार सुरू झाल्याने नागरिकांची धावपळ उडाली. सर्वत्र अंधार, विद्युत तारा पडल्याची चर्चा आणि खांबावरील आगीमुळे एकच गोंधळ उडाला.४गजबजलेल्या मेनरोडवर ग्राहक पळत होते, तर काही दुकानदारांनी तत्काळ आपली दुकाने बंद करून सर्व बाहेर आले. अग्निशामक दल दाखल झाल्यानंतर महावितरणचे कर्मचारी दाखल झाले आणि त्यांनी विद्युतपुरवठा बंद केला.४विद्युत पुरवठा करणाºया फिडर मध्ये दोषनिर्माण झाल्यानंतर मेनरोडवरील विद्युत खांबावर शॉर्टसर्कि ट झाले.

टॅग्स :Accidentअपघातelectricityवीज