Electricity kills youth in Khambalewadi | खंबाळेवाडीतील युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

खंबाळेवाडीतील युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील खंबाळे वाडी येथील युवक मासेमारी करून परतत असतांना रस्त्यात विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याच्यासोबत असलेल्या भावालाही विजेचा झटका बसल्याने तो जखमी झाला आहे.
खंबाळे वाडी येथील गोकुळ दशरथ मुकणे (२२) हा युवक मासेमारी करून घरी परतत होता. रस्त्यात एका शेतकऱ्याने डुकरे भुईमुग खाऊन पीकाचे नुकसान करतात म्हणुन शेताजवळ वीजप्रवाह सोडलेला होता. त्या वीजप्रवाहाचा धक्का या युवकाला बसल्याने त्याचा मृत्यू झाला. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या भाऊराव दशरथ मुकणे (२५) या भावासही विजेचा धक्का बसल्याने तो जखमी झाला आहे. त्यांना पुढील तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. याबाबत माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांनी वीज वितरणचे अधिकारी यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून तहसीलदारांकडे तात्काळ आर्थिक भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
 

Web Title:  Electricity kills youth in Khambalewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.