वीज कंपनीचा अभियंता लाच घेताना जाळ्यात
By Admin | Updated: July 22, 2016 00:55 IST2016-07-22T00:52:16+5:302016-07-22T00:55:18+5:30
वीज कंपनीचा अभियंता लाच घेताना जाळ्यात

वीज कंपनीचा अभियंता लाच घेताना जाळ्यात
नाशिकरोड : जेलरोड येथे एका हौसिंग सोसायटीच्या आठ स्वतंत्र वीजजोडणीसाठी २४ हजार रुपयांची लाच घेताना जेलरोड शिवाजीनगर येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता दीपक उल्हास चौधरी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
जेलरोड येथील एका सोसायटीच्या अध्यक्षांनी सोसायटीतील सात सदस्य व सोसायटीसाठी स्वतंत्र अशा आठ नवीन वीज जोडणी मिळण्यासाठी २१ एप्रिल रोजी कोटेशनसह महावितरणच्या द्वारका येथील खरबंदा पार्क येथे अर्ज केला होता. नवीन वीज जोडणी मंजूर झाल्यानंतर पुढील कारवाईसाठी त्यांना जेलरोड शिवाजीनगर येथील महावितरणच्या कार्यालयात पाठविण्यात आले होते. संबंधित तक्रारदार शिवाजीनगर येथील महावितरणच्या कार्यालयात गेले असता कनिष्ठ अभियंता दीपक चौधरी यांनी नवीन जोडणीच्या प्रत्येक कनेक्शनसाठी तीन हजार याप्रमाणे २४ हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली
होती. (प्रतिनिधी)