येवला-लासलगाव भागात वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 19:30 IST2018-11-29T19:28:37+5:302018-11-29T19:30:41+5:30

येवला : येवला तालुका व लासलगाव परिसरातील खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे. गेल्या सहा-सात दिवसांपासून येवला तालुका व निफाड तालुक्यातील लासलगाव परिसरातील पालखेड डावा तट कालव्यालगत असणाऱ्या गावातील वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे.

Electricity break in Yeola-Lasalgaon area | येवला-लासलगाव भागात वीजपुरवठा खंडित

येवला-लासलगाव भागात वीजपुरवठा खंडित

ठळक मुद्देरात्री वीज नसल्याकारणाने भीतीपोटी नागरिक भयभीत

येवला : येवला तालुका व लासलगाव परिसरातील खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
गेल्या सहा-सात दिवसांपासून येवला तालुका व निफाड तालुक्यातील लासलगाव परिसरातील पालखेड डावा तट कालव्यालगत असणाऱ्या गावातील वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. पिण्याच्या पाण्याचे आवर्तन चालू असून, शेतकºयांनी पाणी उचलू नये म्हणून सदरची कारवाई जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने झाल्याचे विद्युत मंडळाचे अधिकारी सांगत आहेत; मात्र विहिरीत पाणी असून हाता-तोंडाशी आलेल्या पिकांना पाणी देणे गरजेचे असताना सदरची कारवाई चुकीच्या पद्धतीने करण्यात येत आहे. रात्री वीज नसल्याकारणाने भीतीपोटी नागरिक भयभीत झालेले आहेत.
येवला-लासलगाव परिसरातील शेतकºयांना कोणीच वाली नसल्यामुळे आई जेऊ देईना, बाप भीक मागू देईना अशी अवस्था शेतकºयांची झालेली आहे. तरी पण अखंडित वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा अन्यथा शेतकरी येवला व लासलगाव वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकतील असा इशारा भाजपा नेते बाबा डमाळे यांनी दिला आहे.
या निवेदनावर बाळासाहेब काळे, अमोल सोनवणे, नंदू धनगे, अरुण देवरे, रामू भागवत, संपतराव बोरनारे, माणिक दौंडे, आप्पासाहेब भागवत, नाना शेळके, जगदीश गायकवाड, अण्णा ढोले, बाबा सोनवणे, गजानन देशमुख, गणेश कोटमे, संतोष वलटे, शिवा सोनवणे, अमोल केरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकºयांच्या सह्या आहेत.

Web Title: Electricity break in Yeola-Lasalgaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी