उभ्या ट्रकवर पडली विजेची तार; मालेगावी दोन ट्रक जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 22:52 IST2022-03-29T22:52:07+5:302022-03-29T22:52:34+5:30
मालेगाव : शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गावर जुना फारान हॉस्पिटलजवळ उभ्या असलेल्या ट्रकवर वीज वितरण कंपनीची केबल तुटून पडल्याने लागलेल्या आगीत दोन ट्रक जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार बंबांच्या साहाय्याने आग विझविण्यात यश मिळविले.

उभ्या ट्रकवर पडली विजेची तार; मालेगावी दोन ट्रक जळून खाक
मालेगाव : शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गावर जुना फारान हॉस्पिटलजवळ उभ्या असलेल्या ट्रकवर वीज वितरण कंपनीची केबल तुटून पडल्याने लागलेल्या आगीत दोन ट्रक जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार बंबांच्या साहाय्याने आग विझविण्यात यश मिळविले.
शहरात भरदुपारी ट्रकला आग लागल्याने मोठी गर्दी झाली होती. विजेच्या खांबावरून विजेची वायर तुटून ट्रकवर पडल्याने ट्रकने पेट घेतला. त्यात पेस्टीसाईड्स शेतीऔषधे होती, ती सर्व जळून लाखोंचे नुकसान झाले. तर शेजारी रिकामा ट्रक उभा होता. त्यालाही पेटलेल्या ट्रकमुळे आग लागल्याने तोही जळून खाक झाला.
एमएच ११ एम ४४७१ आणि एमएच ०४ ईबी ३०९९ हे दोन्ही ट्रक आग लागून भस्मसात झाले. अग्निशमन दलाच्या चार बंबाना आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. सध्या शहरात उन्हाचा उकाडा वाढत असून ४० अंशांवर उन्हाचा पारा गेला आहे, त्यामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.