शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

देवळा बसस्थानकात विजेचा खांब कोसळल्याने धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 10:54 PM

बसस्थानकातील विजेचा खांब वाहिन्यांसह कोसळल्याने प्रवाशांची एकच धावपळ उडाली. यावेळी वीजप्रवाह सुरू होता, सुदैवाने कोणताही अनुचित घटना घडली नाही. घटनेची माहिती मिळताच विद्युत विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

ठळक मुद्देप्रवाशांमध्ये घबराट । महावितरणचे दुर्लक्ष, तातडीने दुरुस्तीची मागणी

देवळा : येथील बसस्थानकातील विजेचा खांब वाहिन्यांसह कोसळल्याने प्रवाशांची एकच धावपळ उडाली. यावेळी वीजप्रवाह सुरू होता, सुदैवाने कोणताही अनुचित घटना घडली नाही. घटनेची माहिती मिळताच विद्युत विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.अनेक वर्षांपासून सातत्याने देवळा बसस्थानकात प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी केली जात होती. दोन महिन्यांपूर्वी बसस्थानकाच्या नूतन इमारत पुनर्बांधणीचे काम सुरू झाले आहे. परिवहन विभागाने जागा खाली करण्याबाबत नोटिसा दिल्यानंतर महिनाभरापूर्वी बसस्थानकातील एस.टी. कॅन्टीन,पेपर एजन्सी, कटलरी, नाभिक आदी व्यावसायिकांनी आपल्या जागा खाली करून दिल्या आहेत. बसस्थानकाची जुनी इमारत पाडण्यात आली आहे.शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास या पाडलेल्या इमारतीचे फरशा, पत्रे आदी जुने साहित्य परिवहन विभागाचे कर्मचारी वाहनात भरत होते. त्यावेळी शेजारी असलेला विजेचा खांब अचानक कोसळला. यामुळे जीवंत वीजवाहिन्या स्थानक आवारात उभ्या असलेल्या दुचाकींवर व जमिनीवर पडल्या. सुदैवाने तेथे कोणी उभे नव्हते. मोठा आवाज झाल्याने प्रवाशांची एकच धावपळ उडाली. विद्युत प्रवाह बंद झाल्यामुळे अनुचित घटना टळली. वीज वितरण कंपनीने देवळा शहर परिसरातील सर्व जुन्या- जीर्ण झालेल्या खांबांचे आॅडिट करण्याची आवश्यकता असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. जुन्या एसटी कॅन्टीनसमोर अनेक वर्षांपासून उभा असलेला विजेचा खांब तळाशी गंजल्यामुळे कमकुवत झाला होता. बसस्थानकाची इमारत पाडल्यानंतर निघालेल्या जुन्या फरशा या खांबाच्या आजूबाजूला रचून ठेवण्यात आल्या होत्या व त्या आधारावर हा खांब उभा होता. वितरण विभागाने वेळीच दखल घेतली असती तर ही घटना घडली नसती अशी चर्चा प्रवासी व नागरिकांमध्ये सुरू होती.देवळा शहर हे चौफुलीवर वसलेले गाव असून, येथून राज्य व आंतरराज्य बसेसची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. स्थानकात नाशिक, नंदुरबार, साक्र ी, सटाणा, सुरत, पुणे, मुंबई, नगर, धुळे, जळगाव आदी आगारांच्या बसेसची दिवसभर ये-जासुरू असते. यामुळे स्थानक दिवसभर गजबजलेलेअसते.

टॅग्स :mahavitaranमहावितरण