शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
3
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
4
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
5
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
6
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
7
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
8
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
9
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
10
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
11
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
12
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
13
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
14
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
15
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
16
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
18
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
19
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
20
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय सेवेत नसताना केले निवडणुकीचे काम

By admin | Updated: January 20, 2016 23:04 IST

मालेगाव : ४० तरुणांची नेमणूक; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौैकशी

प्रवीण साळुंके मालेगावपरिसरातील १२० तरुणांना सार्वजनिक बांधकाम विभागात बोगस नोकरीच्या नियुक्त्या देत १८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार ५ जानेवारीला उघड झाला. या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्याने अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. यातील सर्वात कहर म्हणजे यातील तब्बल ४० जणांची निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्ती करण्यात आल्याचे उघड झाल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे.शहरातील न्यायालयासमोरील इमारतीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वेब मॅनेजमेंट नावाचे कार्यालय सुरू करण्यात आले होते. या कार्यालयामार्फत १२० तरुणांना नोकरीवर नियुक्ती देण्यात येऊन त्यांना मे २०१५ पर्यंत पगार देण्यात आला होता. मात्र मेपासून पगार बंद झाल्याने या तरुणाची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.सदर तरुण शासकीय नोकरीत नसताना ४० तरुणांनी दोन निवडणुकीच्या मतदानासाठी नियुक्त करण्यात आल्याचे उघड झाले आहे. यात विधानसभा निवडणुकीचा समावेश आहे. या तरुणांना तत्कालीन तहसीलदारांच्या आदेशाने नियुक्त करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यात नांदगाव मतदारसंघात २४, मालेगावच्या दोन्ही मतदारसंघात १२ तर सटाणा मतदारसंघात ४ तरुणांनी निवडणुकीचे काम केलेले आहे. या तरुणांनी पुरावे सादर केल्याची माहिती मिळाली असून, यातील गांभीर्य वाढले आहे. या प्रकरणातील फिर्यादीने जिल्हाधिकाऱ्यांना या आदेशाच्या प्रती सादर केल्याचे समजते. त्या नियुक्तीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असून, मंगळवारी तहसीलच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आल्याची माहिती आहे. यात या तरुणांनी आमच्या नेमणुका बोगस होत्या तर आम्हाला निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या कामात नियुक्तीचे आदेश कसे देण्यात आले होते, असा प्रश्न उपस्थित केला आहे.