शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अहेर पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

By admin | Updated: August 6, 2016 00:11 IST

कळवण : अध्यक्षपदी नंदकुमार खैरनार, तर विसपुते उपाध्यक्ष

 कळवण : डॉ. दौलतराव अहेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भाजपा नेते नंदकुमार खैरनार, तर उपाध्यक्षपदी उद्योजक भूषण विसपुते यांची आज संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा कळवणचे सहकार अधिकारी अविनाश खैरनार यांच्या प्रमुख उपस्थितीत पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी कै. प्रमोद महाजन सभागृहात निवडणूक घेण्यात येऊन पतसंस्थेच्या अध्यक्षपदासाठी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार खैरनार, तर उपाध्यक्ष पदासाठी उद्योजक भूषण विसपुते यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार अधिकारी अविनाश खैरनार यांनी केली. कळवण तालुका कार्यक्षेत्र असलेल्या डॉ दौलतराव आहेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या सन २०१६ ते २०२१ या पंचवार्षिकची संचालक मंडळाची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडलीसन २०१६ ते २०२१ या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीत पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार खैरनार, पतसंस्थेचे विद्यमान संचालक व भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, भूषण विसपुते, माजी सरपंच अजय मालपुरे, रोटरीचे सहप्रांतपाल विलास शिरोरे, उद्योजक मोहनलाल संचेती, कमकोचे माजी अध्यक्ष सुरेश कोठावदे, उद्योगपती रामदास दशपुत्रे, दिलीप कोठावदे, रामदास येवला, नामदेव जाधव, शिवदास शिवदे ,जिल्हा मजूर संघाच्या संचालक प्रतिभा शिरसाठ, अनिता खैरनार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी संस्थेचे सभासद, खातेदार, हितचिंतक आण िमित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)