शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
6
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
7
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
8
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
9
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
11
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
12
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
13
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
14
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
15
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
16
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
17
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
18
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
19
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
20
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची आज निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 01:07 IST

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपाने अखेरीस सहा इच्छुकांपैकी उद्धव निमसे यांना उमेदवारी दिली असून, गेल्या अनेक दिवसांपासून प्रबळ दावेदार मिळणाऱ्या गणेश गिते यांचा पत्ता कट केला आहे.

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपाने अखेरीस सहा इच्छुकांपैकी उद्धव निमसे यांना उमेदवारी दिली असून, गेल्या अनेक दिवसांपासून प्रबळ दावेदार मिळणाऱ्या गणेश गिते यांचा पत्ता कट केला आहे. बुधवारी (दि.१७) निमसे यांनी महापौरांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. निमसे यांना अन्य विरोधी पक्षांनी आव्हान दिले नसले तरी सत्तारूढ भाजपाच्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेच आव्हान देण्याचा प्रयत्न केला असून, या पक्षाच्या कल्पना पांडे यांनी अर्ज दाखल केला आहे.महापालिकेची तिजोरी मानल्या जाणाºया स्थायी समितीला महापालिकेच्या अर्थकारणात विशेष महत्त्व आहे. विशेषत: यंदाच्या निवडणुकीवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या राजकारणाचेदेखील सावट आहे. महापालिकेच्या स्थायी समिती आणि अन्य विषय समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुका गुरुवारी (दि. १८) होणार आहेत. सर्वाधिक महत्त्वाच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपात सर्वप्रथम गणेश गिते यांची दावेदारी बळकट मानली जात होती. पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांचे नाव जोरात असले तरी अन्य इच्छुकांनी त्यांच्या स्तरावर तयारी केली होती. नुकत्याच पार पडलेल्या विषय समित्यांच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत भाजपाचे २० सदस्य नियुक्त झाले असून, त्यात १२ जण केवळ पूर्व विधानसभा मतदारसंघातील असल्याचे निमित्त करून गिते यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला होता. भाजपाकडून गिते यांच्या व्यतिरिक्त उद्धव निमसे, कमलेश बोडके तसेच मध्य विधानसभा मतदारसंघातून स्वाती भामरे आणि पश्चिम विभागातून भाग्यश्री ढोमसे, पुष्पा आव्हाड यांनी इच्छा व्यक्त केली होती. दोन दिवसांपासून अनेकांनी मुंबई, नाशिक अशा वाºया केल्या होत्या. तसेच संघटनमंत्री किशोर काळकर यांच्याकडे विशिष्ट व्यक्तींनाच झुकते माप दिल्याच्यादेखील तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे भाजपाच्या वतीने उमेदवारी दाखल करण्याच्या दिवशी एकच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी (दि.१७) सकाळी साडेअकरा वाजता पक्षाने गणेश गिते, उद्धव निमसे आणि स्वाती भामरे या तिघांना अर्ज भरून ठेवण्यास सांगितले आणि  त्यानंतर दुपारी एक वाजता उमेदवारी दाखल करण्यास दहा मिनिटे बाकी असताना निमसे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेता सतीश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील, शिवाजी गांगुर्डे, गणेश गिते यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, भाजपाच्या उमेदवारीचा घोळ सुरू असतानाच शिवसेनेच्या वतीने कल्पना पांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.भाजपातील विधानसभेची तयारी तसेच आमदारांमधील रस्सीखेच यातून उद्धव निमसे यांचे नाव अखेरीस निश्चित झाले. निमसे यांनी कॉँग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर स्थायी समिती सभापतिपद भूषविले आहे. विशेष म्हणजे स्थायी समितीत एक वर्ष पूर्ण झालेल्या सदस्यांना बाहेर काढून त्यांच्या जागी नवीन नगरसेवकांना संधी देण्याच्या भाजपाच्या मोहिमेत निमसे यांचेही नाव होते. त्यांचा समितीवरील एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला असताना त्यांना ही संधी दिल्याने अन्य तीन नगरसेवकांनादेखील राजीनामा न देता समितीवरच राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.भाजपाचा दोन तासांचा सस्पेन्सस्थायी समिती सभापतिपदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल होईल, असे सांगितले जात असताना प्रत्यक्षात मात्र तीन अर्ज ‘भरण्यास’ म्हणजे केवळ अर्ज लिहून ठेवण्यास सांगण्यात आले.४साडेअकरा वाजता संघटन मंत्री किशोर काळकर यांनी गणेश गिते, उद्धव निमसे आणि स्वाती भामरे यांनीच अर्ज तयार ठेवावे, असे सांगितले, त्यानुसार तयारी करण्यात आली.४भाजपाची सर्व सूत्रे मुंबईहून फिरत होती. दोन तासांच्या सस्पेन्सनंतर उमेदवारी दाखल करण्याची वेळ टळत आल्यानंतर १२.५० वाजता उद्धव निमसे यांचे नाव घोषित करण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक