शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक निकालाचे पडसाद

By admin | Updated: February 25, 2017 01:19 IST

इव्हीएम प्रकरणी आडगावला बंद

पंचवटी : प्रभाग क्रमांक तीनमधील भाजपा उमेदवारांनी इव्हीएम मशीनमध्ये घोळ केल्याने मतदान संख्येत तफावत असल्याचा आरोप करून जमावाने दगडफेक केली़ यामध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीमारात आडगावमधील चार ते पाच नागरिक जखमी झाले आहेत़ प्रभाग एक ते तीनमध्ये झालेल्या बोगस मतदानामुळे या ठिकाणी फेरमतदान घेण्यात यावे. तसेच नागरिकांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आडगाव ग्रामस्थ व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आडगावात बंद पाळला. आमदार तथा भाजपा शहरअध्यक्ष बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप हे प्रभाग क्रमांक तीनमध्ये उमेदवार असल्याने या लढतीकडे सर्व शहराचे लक्ष लागले होते. दुपारी चारनंतर मीनाताई ठाकरे क्रीडासंकुलात मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिली फेरी आटोपल्यावर काहींनी इव्हीएम मशीनमध्ये सेटिंग केल्याचा आरोप करून फेरमोजणीची मागणी केली होती. त्यामुळे बराचवेळ गोंधळ सुरू होता़ काहीतास मतमोजणी प्रक्रिया थांबल्यानंतर आरोपकर्त्यांच्या मागणीनुसार पुन्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेरमोजणी केली, मात्र मतमोजणी केंद्राबाहेर अफवा पसरल्याने नागरिकांचा मोठा जमाव जमला़ इव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याचे वृत्त परिसरात वाऱ्यासारखे पसरले व जमावातील काहींनी घोषणाबाजी करून मतमोजणी केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केला, तर जमावातील काही संतप्त नागरिकांनी दगडफेक करीत रस्त्यावरील वाहनांच्या काचा फोडल्या, तर काही दुचाकी पाडल्या़ त्यातच पोलीस वाहनांच्या काचा फोडल्याने परिसरात तणाव पसरू लागल्याने जमावाला शांत होण्याचे आवाहन केले गेले.  जमावाने दगडफेक सुरूच ठेवल्याने जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला़ त्यामुळे नागरिकांनी पळापळ झाली, तर काही पोलिसांवर थेट दगडफेक करीत असल्याने पोलिसांनी लाठीमार केला़गुरुवारी मतमोजणीच्या दिवशी घडलेल्या या घटनेचे पडसाद दुसऱ्या दिवशीही कायम होते़ आडगाव व हिरावाडी परिसरात दुसऱ्या दिवशीही काहीकाळ तणावाचे वातावरण होते़ त्यामुळे हिरावाडी तसेच आडगाव परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ इव्हीएम मशीनमध्ये झालेल्या घोळाचा व पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आडगावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी  शुक्रवारी (दि़२४) आडगाव बंद ठेवले़