शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रक्रियेस हिरवाकंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 23:59 IST

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डास प्राप्त झाले आहेत. त्यानुसार फेब्रुवारी २०२० मध्ये बोर्डाची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

देवळाली कॅम्प : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डास प्राप्त झाले आहेत. त्यानुसार फेब्रुवारी २०२० मध्ये बोर्डाची निवडणूक होण्याची शक्यता आहे.विद्यमान बोर्डाची मुदत दि. १० फेब्रुवारी २०२० रोजी संपत असून, तत्पूर्वी नवीन बोर्डाची निवडणूक प्रक्रिया पार पाडणे कॅन्टोन्मेंट निवडणूक २००७ कायद्यानुसार अनिवार्य आहे. संरक्षण मंत्रालयाने दि २१, नोव्हेंबर रोजी देशभरातील ५६ कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्याधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत आदेशित केले आहे. त्यानुसार मागासवर्गीय तसेच महिला आरक्षणबाबत वॉर्ड निश्चित करणे कामी सोडत काढण्याचे सूचित करण्यात आले आहे. देवळालीत सध्या अनुसूचित जातीसाठी दोन वॉर्ड राखीव असून, त्यापैकी एक वॉर्ड महिलांसाठी राखीव आहेत. तर इतर सर्वसाधारण असलेल्या सहा वॉर्डांपैकी दोन वॉर्ड महिलांसाठी राखीव आहेत. कॅन्टोन्मेंट निवडणूक कायद्यातील तरतुदीनुसार महिला आरक्षण फिरते राहणार आल्याने सध्या मागासवर्गीयांसाठी महिला राखीव असलेला वॉर्ड एक हा त्याच वगार्साठी खुला होणार असून, वॉर्ड ५ हा मागासवर्गीय महिलासाठी राखीव होणार आहे.सर्वसाधारण असलेल्या ६ वॉर्ड पैकी रोटेशननुसार वॉर्ड क्रमांक ४ व ८ हे महिला राखीव असल्याने ते नवीन सोडत आरक्षणातून वगळण्यात येऊन उर्वरित वॉर्ड २ व ७ हे दोन वॉर्ड महिलांसाठी सर्वसाधारण वगार्साठी राखीव होण्याची शक्यता आहे. याबाबतचा सोडत काढण्याचा कार्यक्रम स्थानिक पातळीवर राबविल्याचा संपूर्ण अहवाल संरक्षण मंत्रालयास जाणार आहे. २४ डिसेंबरपर्यंत आत सर्वसाधारण महिला आरक्षण, मागासवर्गीय राखीव प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश आहेत. त्यानंतर संरक्षण मंत्रालय निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे.आरक्षणामुळे बदलणार राजकीय गणितं

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक