निवडणूक दक्षता : गुन्हेगारांची हिवाळे टोळी शहरासह जिल्ह्यातून तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 04:14 PM2019-10-09T16:14:58+5:302019-10-09T16:19:32+5:30

परिमंडळ एकमधून अद्याप १६१ गुंडांना तडीपार करण्यात आले आहेत. ६२ गुन्हेगारांची चौकशी सुरू असल्याची माहिती उपायुक्त अमोल तांबे यांनी दिली.

Election efficiency: The Hiwale gang of criminals flies from city to district | निवडणूक दक्षता : गुन्हेगारांची हिवाळे टोळी शहरासह जिल्ह्यातून तडीपार

निवडणूक दक्षता : गुन्हेगारांची हिवाळे टोळी शहरासह जिल्ह्यातून तडीपार

Next
ठळक मुद्देटोळीचा म्होरक्याही सहभागी आहे.शहरासह जिल्ह्यात दोन वर्षांपर्यंत येण्यास मज्जाव करण्यात आला

नाशिक : शहर पोलीसांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंजमाळ परिसरातील हिवाळे टोळीमधील सराईत ९ गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. यामध्ये टोळीचा म्होरक्याही सहभागी आहे.
विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी शहर पोलिस प्रशासनाकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई केली जात आहे. येत्या २१ तारखेला निवडणूकीचे मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जुने नाशिकसारख्या संवेदनशील भागासह संपुर्ण शहरात गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रीय असणाऱ्या हिवाळे टोळीला जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले. परिमंडळ एकमधून अद्याप १६१ गुंडांना तडीपार करण्यात आले आहेत. ६२ गुन्हेगारांची चौकशी सुरू असल्याची माहिती उपायुक्त अमोल तांबे यांनी दिली.
गंजमाळ, भिमवाडी येथील टोळीप्रमुख नितीन धुराजी हिवाळे (१९), विश्वास उर्फसोनु सुभाष कांबळे (१८), भीमा रामभाऊ पाथरे (१८), सुरज तुळशीराम लहाडे (२१), योगेश धुराजी हिवाळे (२३), अमोल पांडुरंग कोळे (२३), श्याम मच्छिंद्र चव्हाण (२१) व शाहू उर्फ शाहिर आसाराम जावळे (२१) या सराईत गुन्हेगारांचा हिवाळे टोळीमध्ये सहभाग होता. या सर्वांना शहरासह जिल्ह्यात दोन वर्षांपर्यंत येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या सराईतांपैकी कोणीही शहरासह गावपातळीवर आढळून आल्यास थेट अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबतची माहिती सर्व पोलीस ठाण्यांना कळविण्यात आली आहे. या टोळीने भद्रकाली, सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्हेगारी कारवाया करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. टोळीप्रमुख नितीन हिवाळे व त्याच्या अन्य साथीदारांविरूद्ध विविध पोलीस ठाण्यात शरिराविरूद्धचे तसेच संपत्तीविरूद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अनेकदा समज देऊनही त्यांच्यामध्ये सुधारणा न झाल्याने पोलीस तांबे कायदेशीररित्या त्यांच्यावर तडीपारीची कारवाई केली.

Web Title: Election efficiency: The Hiwale gang of criminals flies from city to district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.