निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 13:32 IST2020-02-06T13:31:52+5:302020-02-06T13:32:00+5:30
खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे तेथे नव्याने पंचवार्षिक निवडणुका घेण्याची तयारी महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.

निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींची निवडणूक
खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची मुदत जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधी संपत आहे. त्यामुळे तेथे नव्याने पंचवार्षिक निवडणुका घेण्याची तयारी महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी तालुक्यातील पासष्ट ग्रामपंचायतीमध्ये ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी रोजी प्रभाग रचना आणि आरक्षण कार्यक्र म राबविण्यात आला. यासाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते.
सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्र म पार पाडण्यासाठी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, यांच्यासह पंचायत समिती तसेच विविध विभागातील अधिकाऱ्यांची सोडत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ही आरक्षण सोडत व प्रभाग रचनेचा कार्यक्र म वेळेत पार पाडण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला विशेष ग्रामसभा घेण्यासाठीचे नियोजन करु न देण्यात येवुन तशा सुचना तालुक्या कार्यालयांकडुन देण्यात आलेल्या आहे. दरम्यान तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीची मुदत जुलै ते डिसेंबर या कालावधीत संपल्याने पुढच्या सहा महिन्यात तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या धुरळा उडणार आहे एकाच वेळी ६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे
------------------------------
या ग्रामपंचायतींच्या निवडणुका
निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे, खेडे, रु ई-धानोरे, कोळगांव, देवगांव-महादेवनगर, नैताळे-रामनगर, शिवडी, उगांव, रानवड, वनसगांव, ब्राम्हणगांव वनस, दावचवाडी, सावरगांव, रेडगांव, नांदुर खुर्द, दारणासांगवी, गोंडेगांव, नारायणगांव(खेरवाडी), दात्याणे, ओणे, लासलगांव, पिंपळगांव निजक, टाकळी विंचुर, ब्राम्हणगांव विंचुर, विंचुर-विठ्ठलवाडी, सुभाषनगर, गोंदेगांव, रौळस, पिंपरी, काथरगांव, सुंदरपुर, कोठुरे, सोनेवाडी बु., रसलपुर, शिरवाडे वाकद, नांदगांव, भरवस-मानोरी खु., वाहेगांव-दहेगांव, वाकद, शिरसगांव, वडाळी निजक, ओझर, चाटोरी, महाजनपुर, औरंगपुर-श्रीरामपुर, भेंडाळी, रामनगर, सोनगांव, चापडगांव, करंजगाव, पिंपळगांव निपाणी-सावळी, सायखेडा, आहेरगांव, बेहेड, उंबरखेड, वावी, शिरवाडेवणी, कारसुळ, मुखेड, अंतरवेली, भुसे, म्हाळसाकोरे, गाजरवाडी, करंजी खुर्द-ब्राम्हणवाडे, नांदुरमध्यमेश्वर या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.