क्रूझर-दुचाकी अपघातात वृद्ध महिला जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 19:56 IST2021-08-03T19:55:46+5:302021-08-03T19:56:15+5:30

ननाशी : दिंडोरी तालुक्यातील धोंडाळपाडा शिवारात क्रूझर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक वृद्ध महिला जागीच ठार झाली असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

An elderly woman was killed on the spot in a cruiser-bike accident | क्रूझर-दुचाकी अपघातात वृद्ध महिला जागीच ठार

क्रूझर-दुचाकी अपघातात वृद्ध महिला जागीच ठार

ठळक मुद्देननाशी : वाहनांची जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

ननाशी : दिंडोरी तालुक्यातील धोंडाळपाडा शिवारात क्रूझर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक वृद्ध महिला जागीच ठार झाली असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी (दि. ३) दुपारच्या सुमारास गिरीधर राठोड (२३), मयूरी गिरीधर राठोड (२०) रा. टापूपाडा ता. सुरगाणा आणि पार्वताबाई बळवंत पवार (६५) रा. धोंडाळपाडा, ता. दिंडोरी हे (एम. एच. १८ एल ५०५५) दुचाकीने ननाशीकडून धोंडाळपाड्याकडे जात असताना गावाच्या अलीकडे समोरून येणारी क्रूझर (एम. एच. १४ जी. एच. ७४०३) आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीवर बसलेल्या पार्वताबाई पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर गिरीधर राठोड आणि मयूरी राठोड हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
जखमीपैकी गिरीधर यास जबर मुका मार लागला असून तर मयूरी हिच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिकला दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उशीरे, पाटील, पोलीस नाईक मोरे, गावित आदी पुढील तपास करीत आहेत.
(०३ ननाशी)
धोंडाळपाडानजीक अपघातातील अपघातग्रस्त दुचाकी.

Web Title: An elderly woman was killed on the spot in a cruiser-bike accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.