शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात मॉर्निंग वॉक करताना वृद्धा ठार; भरधाव कारने दोघांना उडविले

By अझहर शेख | Updated: November 7, 2023 18:46 IST

गणेश भाऊराव डोंगरे (३९) असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असल्याचे अंबड पोलिसांनी सांगितले.

नाशिक : शहर व परिसरात रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूच्या घटना सुरूच आहेत. वडाळा-पाथर्डी रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका वृद्धेला भरधाव दुचाकीने धडक दिली. या धडकेत गंभीररीत्या जखमी झालेल्या ताराबाई रतनलाल परदेशी (७०, रा. बालाजी दीप अपार्टमेंट, इंदिरानगर) यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत लेखानगरच्या स्टेट बँक चौकासमोर भरधाव जाणाऱ्या मारुती स्विफ्ट डिझायर कारने दुचाकीस्वारांना उडविले. यावेळी कारचालक विरुद्ध दिशेने बेदरकारपणे वाहन चालवीत आल्याने समोरासमोर झालेल्या या धडकेत दुचाकीस्वार दोघे युवक बाजूला फेकले गेले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीररीत्या जखमी झाला आहे. गणेश भाऊराव डोंगरे (३९) असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असल्याचे अंबड पोलिसांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी (दि.७) पहाटे गणेश डोंगरे हे त्यांचे मित्र ज्ञानेश्वर कटारेसोबत दुचाकीने (एमएच- १५, डीई- ६३०४) लेखानगरकडून पाथर्डी फाट्याकडे जात होते. मुंबई-आग्रा महामार्गाच्या समांतर रस्त्यावरून प्रवास करताना स्टेट बँकेच्या चौकात विरुद्ध बाजूने भरधाव आलेल्या कारच्या (एमएच- १५, एफएफ- ०७६९) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत वाहनाच्या वेगावर नियंत्रण न ठेवता डोंगरे यांच्या दुचाकीला धडक दिली. ही दुर्घटना मंगळवारी  पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. अपघात इतका भीषण होता की, मोटार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकावर चढून गवतामध्ये जाऊन थांबली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. कटारे यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी कारचालकाविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारचालकाचा अंबड पोलिस शोध घेत आहेत.नाशिक शहर व परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. रस्ते अपघातात पादचाऱ्यांचा होणारा मृत्यू चिंतेचा विषय बनला आहे. शहरात बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. 

भगूर रस्त्यावर दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. भगूर रस्त्यावर दुचाकीचालकाचा तोल जाऊन कोसळल्याने मृत्यू झाला. नाणेगाव-भगूर रस्त्यावर घडली. येथून दुचाकीने शनिवारी (दि.४) सुदाम आसाराम उदावंत (५०, रा. नाणेगाव) हे दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्रवास करत होते. यावेळी रामबागसमोर त्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळले. यामुळे त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांना जवळच्या धामणगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून पुढील उपचारासाठी पुतण्या अक्षय उदावंत याने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात