नाशिकमध्ये एकनाथ शिंदे गटाची संघटना बांधणी, ग्रामीण जिल्हाप्रमुखपदी अनिल ढिकले
By संजय पाठक | Updated: September 18, 2022 19:10 IST2022-09-18T19:09:37+5:302022-09-18T19:10:08+5:30
जनसामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठी आपल्या पक्षाची शाखा गावागावात उघडा अशा सूचना वजा आवाहन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.

नाशिकमध्ये एकनाथ शिंदे गटाची संघटना बांधणी, ग्रामीण जिल्हाप्रमुखपदी अनिल ढिकले
नाशिक - शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाची जोरदार बांधणी सुरू झाली आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा प्रमुखपदी अनिल ढिकले तर दिंडोरी ग्रामीणच्या जिल्हाप्रमुखपदी भाऊलाल तांबडे यांची आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नियुक्ती केली आहे.
खा. हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांनी अनिल ढिकले आणि भाऊलाल तांबडे यांना नियुक्तीपत्र दिले. जनसामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठी आपल्या पक्षाची शाखा गावागावात उघडा अशा सूचना वजा आवाहन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. येत्या काही काळात निश्चितच गाव तिथे आपल्या पक्षाची शाखा दिसेल अशी ग्वाही यावेळी खासदार गोडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिली आहे.
दिंडोरी ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी भाऊलाल तांबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अनिल ढिकले यांच्याकडे नाशिक लोकसभा मतदारसंघातील देवळाली, इगतपुरी आणि सिन्नर या विधानसभा मतदारसंघाचे जबाबदारी असणार असून भाऊलाल तांबडे यांच्याकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सुरगाणा - कळवण, दिंडोरी -पेठ आणि निफाड या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.