मालेगाव काँग्रेसची धुरा एजाज बेग यांच्या खांद्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 00:07 IST2022-01-25T00:07:20+5:302022-01-25T00:07:56+5:30
मालेगाव : शहरातील काँग्रेसचे आमदार पद भूषविलेल्या पिता-पुत्र शेख रशीद आणि आसिफ शेख यांनी पक्षत्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या काँग्रेसला एजाज बेग यांच्या रूपाने नवा अध्यक्ष मिळाला आहे.

मालेगाव काँग्रेसचे शहराध्यक्ष पद एजाज बेग यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमवेत मालेगाव येथील पदाधिकारी.
मालेगाव : शहरातील काँग्रेसचे आमदार पद भूषविलेल्या पिता-पुत्र शेख रशीद आणि आसिफ शेख यांनी पक्षत्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या काँग्रेसला एजाज बेग यांच्या रूपाने नवा अध्यक्ष मिळाला आहे.
सोमवारी (दि. २४) मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवनात कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. नवनियुक्त काँग्रेस शहराध्यक्ष एजाज बेज यांच्या नेतृत्वाखाली मनपा निवडणुका लढविण्यात येणार आहेत. प्रदेशाध्यक्ष पटोले फेब्रुवारीत मालेगावी येत असून त्यावेळी मनपा निवडणूकविषयी रणनीती ठरविली जाणार आहे. एजाज बेग माजी स्थायी समिती सभापती असून विद्यमान नगरसेवक आहेत. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मालेगावचे जमील क्रांती, जमील प्लास्टिकवाले, इम्तियाज जमीनवाले, मुक्तारभाई होटलवाले, शफीक कुरेशी, फारूक लाला आदी उपस्थित होते. सचिव मुनाफ हमीद यांनी त्यांचे स्वागत केले.
मनपा निवडणुकीचे आव्हान
मालेगाव शहरात विद्यमान एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी राष्ट्रवादी सोडून एमआयएममधून निवडणूक लढविली होती, तर काँंग्रेसकडून आसिफ शेख यांनी निवडणूक लढविली होती. त्यात आसिफ शेख पराभूत झाले. त्यांनतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसला कुणी वाली राहिला नव्हता, अशी स्थिती निर्माण झाली होती. आता एजाज बेग काँग्रेसला किती बळ मिळवून देतात हे आगामी मनपा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.