आठ वर्षांनी होणार पुष्पप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 02:07 IST2019-01-05T02:07:03+5:302019-01-05T02:07:24+5:30
गेल्या आठ वर्षांपासून बंद असलेले महापालिकेचे पुष्पप्रदर्शन पुढील महिन्यात दि. २२ ते २४ फेबु्रवारी दरम्यान होणार आहे. शासनाच्या नियमानुसार नागरिकांमध्ये निसर्गाबाबत जागरूकता वाढविण्यासाठी वर्षातून एकदा पुष्प प्रदर्शन घेणे बंधनकारक आहे.

आठ वर्षांनी होणार पुष्पप्रदर्शन
नाशिक : गेल्या आठ वर्षांपासून बंद असलेले महापालिकेचे पुष्पप्रदर्शन पुढील महिन्यात दि. २२ ते २४ फेबु्रवारी दरम्यान होणार आहे.
शासनाच्या नियमानुसार नागरिकांमध्ये निसर्गाबाबत जागरूकता वाढविण्यासाठी वर्षातून एकदा पुष्प प्रदर्शन घेणे बंधनकारक आहे. महापालिका यापूर्वी गेली २० ते २५ वर्षे प्रदर्शन भरवित आहे. पुष्प प्रदर्शनच्या उद््घाटनासाठी एका अभिनेत्रीला निमंत्रित केले जाते आणि त्यानंतर तीन दिवस हा उत्सव रंगतो. तनुजा, भक्ती बर्वे, निशिगंधा वाढ अशा अनेक अभिनेत्रींनी या प्रदर्शनाचे उद््घाटन केले आहे. परंतु आठ वर्षांपासून उद्यान विभागाच्या उदासीनता आणि नंतर तरतूद नसल्याच्या कारणावरून पुष्प प्रदर्शन बंद पडले होते. मात्र आयुक्त गमे यांनी यंदा पुष्पोत्सव भरविण्याचे ठरवले असून, त्यानुसार पुढील महिन्यात हे पुष्पप्रदर्शन होणार आहे.