विधीसंघर्षित बालकांकडून चोरीच्या आठ दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 01:11 IST2018-09-22T01:11:05+5:302018-09-22T01:11:23+5:30

पंचशीलनगरमधील तीन विधीसंघर्षित बालकांकडून भद्रकाली पोलिसांनी चोरीच्या तब्बल आठ दुचाकी जप्त केल्या आहेत़ भद्रकाली, पंचवटी व उपनगर पोलीस ठाणे हद्दीतून या दुचाकी चोरण्यात आल्या आहेत़

Eight bicycle stolen from law-breaked children | विधीसंघर्षित बालकांकडून चोरीच्या आठ दुचाकी जप्त

विधीसंघर्षित बालकांकडून चोरीच्या आठ दुचाकी जप्त

नाशिक : पंचशीलनगरमधील तीन विधीसंघर्षित बालकांकडून भद्रकाली पोलिसांनीचोरीच्या तब्बल आठ दुचाकी जप्त केल्या आहेत़ भद्रकाली, पंचवटी व उपनगर पोलीस ठाणे हद्दीतून या दुचाकी चोरण्यात आल्या आहेत़  पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांना पंचशीलनगरमधील दुचाकीचोरी करणाऱ्या विधीसंघर्षित बालकांबाबत माहिती मिळाली होती़ त्यांनी त्यांनी एकास ताब्यात घेतले असता त्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने दुचाकीचोरीची कबुली दिली़ यामध्ये तीन होंडा अ‍ॅक्टिवा (एमएच १५, डीए ५१५३) दुचाकी असून, दोन स्प्लेंडर प्लस (एमएच १५, एसझेड ६९७८, एमएच १५, ईयु १४८४), सीडी डॉन (एमएच १५, बीए ६००७), पॅशन प्रो (नंबरप्लेट नाही) व हिरो होेंडा (एमएच १५, पी ५३४५) या दुचाकीचा समावेश आहे़

Web Title: Eight bicycle stolen from law-breaked children