आयशरचालकाने महिलेवर केला अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 00:19 IST2020-08-14T22:38:31+5:302020-08-15T00:19:26+5:30
पाचवर्षीय मुलासह सिन्नरला निघालेल्या ३५ वर्षीय महिलेवर आयशरचालकाने अत्याचार केल्याची घटना घडली. महिला महामार्गावर सिन्नरला जाण्यासाठी वाहनाची वाट पहात थांबली होती. कोपरगाव बाजूने आयशर येऊन थांबली. चालकाने सिन्नरला घेऊन जाण्याच्या बहाण्याने महिलेला चालकाच्या कॅबिनमध्ये बसून घेतले. मोहदरी घाट उतरून आयशर पुढे जाऊ लागल्यानंतर सदर महिलेला सिन्नर मागे राहिल्याचा अंदाज आला. त्यामुळे तिने आयशर थांबवून सिन्नरला पोहचवा, अशी चालकाला विनंती केली. त्यावेळी चिंचोली फाट्याच्या अलीकडे आयशर रस्त्याच्या कडेला थांबवत महिलेवर अत्याचार केला.

आयशरचालकाने महिलेवर केला अत्याचार
सिन्नर : पाचवर्षीय मुलासह सिन्नरला निघालेल्या ३५ वर्षीय महिलेवर आयशरचालकाने अत्याचार केल्याची घटना घडली.
महिला महामार्गावर सिन्नरला जाण्यासाठी वाहनाची वाट पहात थांबली होती. कोपरगाव बाजूने आयशर येऊन थांबली. चालकाने सिन्नरला घेऊन जाण्याच्या बहाण्याने महिलेला चालकाच्या कॅबिनमध्ये बसून घेतले. मोहदरी घाट उतरून आयशर पुढे जाऊ लागल्यानंतर सदर महिलेला सिन्नर मागे राहिल्याचा अंदाज आला. त्यामुळे तिने आयशर थांबवून सिन्नरला पोहचवा, अशी चालकाला विनंती केली. त्यावेळी चिंचोली फाट्याच्या अलीकडे आयशर रस्त्याच्या कडेला थांबवत महिलेवर अत्याचार केला.
घाबरलेल्या महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन कैफियत मांडली. महिलेची तक्रार पोलीस ठाण्याने नोंदवून घेतली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन घटनेशी संबंधित काही वस्तू जप्त केल्याचे समजते. पोलिसांनी आयशरचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक रहाटे करीत आहे.