शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील आर्द्रतेचा द्राक्षबागेवर दुष्परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:09 IST

नाशिक तालुक्यातील द्राक्षपिकांवर हवेतील आर्द्रता वाढल्याने भुरी, फळकुज, मिलीबग्ज होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पिकाची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत असून, रात्रीच्या फवारण्या करण्यावर भर देण्यात येत आहे.

मातोरी : नाशिक तालुक्यातील द्राक्षपिकांवर हवेतील आर्द्रता वाढल्याने भुरी, फळकुज, मिलीबग्ज होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पिकाची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत असून, रात्रीच्या फवारण्या करण्यावर भर देण्यात येत आहे.नाशिकची ओळख द्राक्ष पंढरी म्हणून असली तरी या गोड द्राक्षामागील कडवट कहाणी व मेहनत अत्यंत त्रासदायक आहे. द्राक्षबागेची छाटणीपासून अंत्यत जिव्हाळ्याने शेतकरी मेहनत घेत असतो, तोच माल तयार होऊन बाजारपेठेत कवडीमोल विकावा लागतो. परंतु असे असले तरी भविष्यातील बाजार भावाचा विचार न करता शेतकरी मेहनतीने रात्रीचा दिवस करत संकटांना तोंड देत असतो. यंदा ही द्राक्ष पिकास पोषक हवामान असल्याने पिकाचे प्रमाण बºयापैकी आलेले आहे. परंतु हिवाळा लागताच द्राक्षबागेतील तपमान झपाट्याने खाली येत असल्याने बागेतील तपमान नियंत्रणात ठेवणे शेतकºयापुढे मोठे आव्हान ठरत आहे. रात्रीच्या वेळेस बुरशीचे प्रमाण वाढत असल्याने रात्रीच्याच फवारण्या देण्यावर भर देण्यात येत आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने बागेत बुरशीजन्य रोगाचे प्रमाण वाढत आहे. भुरीच्या वाढत्या प्रमाणामुळे बुरशीनाशकाच्या फवारण्यावर मोठा खर्च होत असल्याचे परिसरतील शेतकºयांनी सांगितले, बुरशी पाठोपाठ सनबर्न (फळकुज)चे प्रमाणहा वाढत आहे. त्यासाठी कोणतेही औषध नसल्याने बागेवर थेट सूर्यप्रकाशापासून घड वाचविण्यासाठी बागेवर अच्छादन दिले जात आहे, तर पेपरचे कवर लावून घड वाचविला जात आहे. यासाठी शेतकºयांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे, तर अनेक बागांमध्ये शेकोटी करण्याचा प्रयोगही अमलात आणला जात असल्याचे दिसत आहे, थंडीचे प्रमाण वाढत राहिल्यास त्याचा परिणाम द्राक्ष मनी फुगन्यावर होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.द्राक्षबागेवर बुरशीचे प्रमाण वाढत असल्याने रात्रीच्या वेळेस फवारण्या कराव्या लागतात कारण रात्रीच्या वेळी हवेतील आर्द्रता वाढल्याने बुरशीचे घडातील प्रमाण झपाट्याने वाढत असते, तसेच वातावरणातील सकाळी थंड व दुपारी सूर्यकिरणाची तीव्रता यामुळे घडात साठलेले दव मणी कुजण्यास कारणीभूत ठरत आहे .  - शशिकांत पिंगळे, बागायतदार, मुंगसरेशेतकºयांच्या द्राक्षबागेवर मिलीबर्ग (चिकटा)चे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यासाठी लागणाºया औषधीची मागणी होत आहे, तसेच हवेतील गारवा वाढल्याने पिकावर फवारणीही वाढत आहे, शेतकºयांनी बागेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. तसेच फळ कुजण्याचेही प्रमाण असल्याने बागेवर आच्छादन देण्याशिवाय पर्याय नाही.  - बाळासाहेब पिंगळे, दुकानदारहिवाळ्यात मिलीबर्ग द्राक्ष वेळेवर झपाट्याने वर सरकत घडात जाऊन चिकट द्रव्य टाकून स्वत:चे संरक्षण करतो. त्यामुळे घड खराब होतो, त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी तीन हजार ते चार हजार किमतीच्या प्रती एकरी असलेल्या महागड्या औषधाची आठवड्यातून दोनदा फवारणी करावी लागत आहे.  - सुरेश पिंगळे, बागायतदार, चांदशी

टॅग्स :FarmerशेतकरीenvironmentवातावरणTemperatureतापमानagricultureशेती