शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
2
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
3
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
4
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
5
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
6
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
7
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
8
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
9
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
10
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
11
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
12
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
13
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
14
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
15
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
16
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
17
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
18
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
19
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
20
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव

द्राक्ष निर्यातीवर थंडीचा परिणाम अत्यल्पच ७० कंटेनर निर्यात : सहा हजार कंटेनरची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 1:07 AM

जिल्ह्यात दीड लाख एकरवर द्राक्षबागा असून, कडाक्याच्या थंडीचा निर्यातक्षम द्राक्षबागांवर फारसा परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ठळक मुद्देद्राक्षांना फुलोरा व काही ठिकाणी मणींची अवस्था द्राक्षांवर रोगाचा प्रादुर्भाव द्राक्षबागांमध्ये धूर व कीटकनाशकांची फवारणी

नाशिक : जिल्ह्यात दीड लाख एकरवर द्राक्षबागा असून, कडाक्याच्या थंडीचा निर्यातक्षम द्राक्षबागांवर फारसा परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आतापर्यंत बागलाण तालुका व परिसरातून रशिया, मलेशिया, हॉँगकॉँग येथे ७० ते ८० कंटेनरची निर्यात झाल्याचे सांगण्यात आले.मागील आठ दिवसांत रशियात १५ कंटनेर द्राक्षांची निर्यात झाल्याचे सांगितले जाते. सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा संकटात सापडल्याचे चित्र होते. मात्र नंतर हवामान चांगलं राहिल्याने निर्यातक्षम द्राक्षबागांना त्याचा फायदाच झाला. आॅक्टोबरनंतर नोव्हेंबरमध्ये हवामान स्वच्छ असल्याने द्राक्षांना फुलोरा व काही ठिकाणी मणींची अवस्था होती. मध्यंतरी अचानक ढगाळ हवामान होऊन पावसाच्या हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी, नाशिक, निफाड व इगतपुरी तालुक्यांत झाल्या होत्या. मात्र हा पाऊस कोणत्या कारणांमुळे झाला, का झाला, पावसाचे नेमके कारण समजू शकले नव्हते. नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढत असल्याुमळे द्राक्षांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून शेतकºयांना द्राक्षबागांमध्ये धूर व कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. द्राक्ष पिकाखालील क्षेत्र ५२ हजार ३८६ हेक्टर असून, त्यात सर्वाधिक निफाड तालुक्यात १९ हजार ९६६ हेक्टर त्यानंतर दिंडोरीत १५ हजार १६७ हेक्टर व नाशिकमध्ये ११ हजार ६७१ हेक्ट तसेच चांदवड तालुक्यात तीन हजार ७५२ हेक्टर क्षेत्र आहे. यात थॉमसन सिडलेस, सोनाका, तास-इ- गणेश, एच-५, क्रिमसन, फनटासी क्लोन-२ या द्राक्ष जातींची लागवड केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत कळवण, सटाणा, चांदवड व देवळा या भागांतील अर्ली द्राक्षांची जवळपास ४० कंटेनरची निर्यात श्रीलंका व रशिया या देशांमध्ये झाली होती. यावर्षी काढणीला आलेल्या अर्ली द्राक्षांची आतापर्यंत १५ कंटेनरमधून ३३ हजार ६३६ मेट्रीक टन द्राक्षांची निर्यात होऊ शकल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एकुण या हंगामात ७० ते ८० द्राक्ष कंटेनरची निर्यात झाली आहे.मध्यंतरीच्या पावसामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले. मात्र वातावरण चांगले असल्याने निर्यातक्षम द्राक्षांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. मागील वर्षी ६५०० कंटेनर द्राक्षांची निर्यात परदेशात झाली. यंदा सहा हजार कंटेनरच्या आसपास द्राक्ष कंटेनरची निर्यात होईल.