शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

जीवनात शिक्षणाचे नाते महत्त्वाचे : समशेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:22 IST

भविष्यात शिक्षण हेच एक साधन आहे की तेच आपल्याला शिक्षित करू शकते, हे लक्षात घेऊन महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे आता जातीच्या नात्यापेक्षा शिक्षणाचे नाते महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन व्याख्याते प्रकाश समशेर यांनी केले.

नाशिकरोड : भविष्यात शिक्षण हेच एक साधन आहे की तेच आपल्याला शिक्षित करू शकते, हे लक्षात घेऊन महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे आता जातीच्या नात्यापेक्षा शिक्षणाचे नाते महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन व्याख्याते प्रकाश समशेर यांनी केले. आर्टिलरी सेंटररोड जैन मंदिरासमोरील मनपा मैदानावर महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले कला, क्रीडामंडळाच्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आला होते. यावेळी बोलताना व्याख्याते प्रकाश समशेर म्हणाले की, प्रथम पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन समाजातील महिलांना शिक्षित करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिलांना शिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली, असे समशेर यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी नाशिकरोड-देवळाली बॅँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर प्रथमेश गिते, जैन संघपती डॉ. राजेंद्रकुमार मंडलेचा, डॉ. किशोर देवळालकर, विजय शंकर देसाई, महेशकुमार ढकोलिया, विजय मनोहर देसाई, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, जयश्री खर्जुल, आशा तडवी, सुषमा पगारे, सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, बाजीराव भागवत, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, संजय गायकवाड, सुनील आडके, संतू पाटील, जयंत गाडेकर आदि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष संतोष गाडेकर यांनी केले. सूत्रसंचालन सुधाकर जाधव व आभार योगेश गाडेकर यांनी मानले. यावेळी प्रमोद लोणकर, आदेश जाधव, विशाल गाडेकर, अविनाश गाडेकर, संतोष मंडलिक, मिलिंद थोरात, प्रशांत जेजूरकर, लंकेश गाडेकर, रवींद्र रासकर, पोपट गिते, आदर्श गाडेकर, राजेंद्र सोमवंशी आदी उपस्थित होते.आगरटाकळी येथे अभिवादनउपनगरला क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याचा सखोल अभ्यास स्पर्धा परीक्षेचा सराव करताना करता आला. त्यामुळे विचारानुसार कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे प्रतिपादन पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. आगरटाकळी येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कोकाटे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर अशोक दिवे, प्रभाग सभापती शाहीन मिर्जा, नगरसेवक राहुल दिवे, प्रशांत दिवे, दिनकर आढाव, आशा तडवी, सुषमा पगारे, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते आदी मान्यवर उपस्थित होते

टॅग्स :Nashikनाशिक