नाशिक जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 22:26 IST2024-12-24T22:26:07+5:302024-12-24T22:26:36+5:30
जमिनीतून मोठा आवाज होऊन भूकंपसदृश्य धक्का जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.

नाशिक जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के
हरसूल / पेठ (जि. नाशिक) (संदीप बत्तासे) : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल परिसरासह पेठ तालुक्यातील अनेक गावांना मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जमिनीतून मोठा आवाज होऊन भूकंपसदृश्य धक्का जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.
पेठ तालुक्यातील मानकापूर, आडगाव भुवन धानपाडा आदी गावांमध्ये मंगळवारी राथी ८.३० व ९.२७ वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
मागील आठवड्यात सलग दोन-तीन दिवसापासून असे प्रकार होत होते. तत्पूर्वी दिनांक २४ रोजी दुपारी सौम्य तर रात्री ८.३० वा. मोठ्या प्रमाणात भूकंपसदृश्य धक्का अनेक ग्रामस्थांना जाणवला. त्यामुळे हरसूलसह अनेक गावांमधील नागरिक तातडीने रस्त्यावर आले. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक गावांमधील नागरीक मोकळ्या जागेत उभे असल्याचं पाहायला मिळालं.