शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कृषिमंत्र्यांनी टोचले पालकमंत्र्यांचे कान

By admin | Updated: March 22, 2015 00:27 IST

कृषिमंत्र्यांनी टोचले पालकमंत्र्यांचे कान

नाशिक : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी व आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी वेळ मिळत नसल्याचा आरोप असलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काल (दि.२१) शेतकऱ्यांमध्ये रोष असल्याचे कारण यंत्रणेने देऊन आपल्याला येथे येऊ दिले नाही, असा खुलासा केला. यावेळी अधिवेशन सुरू असल्याने काही घोषणा अथवा मदत जाहीर करता येणार नाही, असे सांगणाऱ्या पालकमंत्री गिरीश महाजन यांना केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी नाही मदत तर शेतकऱ्यांना निदान आश्वस्त तरी करा, असे सांगत कान टोचल्याचा प्रकार वनसगाव येथील सभेत घडला.खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांना नाशिक जिल्ह्णातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यानुसार तत्काळ केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी निफाड तालुक्यातील वनसगाव, सारोळे यांसह काही गावांत पाहणी दौरा केला. यावेळी वनसगाव येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी राधामोहन सिंग यांच्यासह महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ खडसे यांनी अधिवेशन सुरू असल्याने आपल्याला येथे मदत अथवा काही घोषणा करता येणार नाही. नाही तर हक्कभंग होईल. मात्र, शेतकऱ्यांना सवलत व कर्जमाफीबाबत आवश्यक ती कार्यवाही करता येईल. तोच धागा पकडून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याला आता काही मदत जाहीर करता येणार नाही. आपणही गेल्या २५ वर्षांपासून विधानसभेत आहोत. संघर्षातूनच मोठे झाले आहोत. मागील वेळी सिन्नरवरून आपण येथे येणार होतो. मात्र, प्रशासन व पोलीस यंत्रणेने शेतकऱ्यांमध्ये रोष असल्याचे सांगत आपल्याला येऊ दिले नाही. म्हणून आपण आज आल्याचे सांगितले. त्याचवेळी राधामोहन सिंग यांनी मदत नाही, तर निदान शेतकऱ्यांंना आश्वास्त तर करा, असे सांगितल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना लवकरच नुकसानीबाबत आवश्यक ती मदत देण्याचा प्रयत्न करेल, असे सांगितले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ. सुभाष भामरे,आमदार अनिल कदम, माजी आमदार दिलीप बनकर आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)