नाशिक : अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्यातील वृक्षराजीवर पावसाळापूर्व जून महिन्यात काजव्यांची चमचम अनुभवण्यासाठी ३० दिवसांत सुमारे ३० ते ३५ हजार पर्यटकांनी भेट दिली. पर्यटकांकडून मिळालेल्या वाहन व व्यक्तीच्या प्रवेश शुल्कापोटी नाशिकवन्यजीव विभागाला तब्बल ७ लाख ६४ हजार ६४० रुपयांची कमाई झाली. एकूण उत्पन्नाचा निम्मा निधी अभयारण्य क्षेत्रातील दहा गावांच्या विकासासाठी वन्यजीव विभाग खर्च करणार असून, उर्वरित निधीचा लाभ पर्यटकांना सोयीसुविधांच्या माध्यमातून देणार असल्याचा दावा वन्यजीव विभागाने केला आहे.नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारितीत असलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्र गड अभयारण्य क्षेत्रात मागील महिन्यात काजव्यांची चमचम अनुभवण्यासाठी तब्बल ३५ हजार पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती वन्यजीव विभागाने दिली. प्रतिपर्यटक ३० रुपये तर पर्यटकांचे हलके वाहन १०० व प्रवासी वाहतूक करणारे अवजड वाहन १५० रुपये प्रवेश शुल्क वन्यजीव विभागाने भंडारदरा-रतनवाडी नाका, शेंडी-घाटघर नाका या ठिकाणी आकारले. महिनाभरात तब्बल ७ लाख ६४ हजार ६४० रुपयांचा महसूल वन्यजीव विभागाला प्राप्त झाला. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी तब्बल दहा हजाराने पर्यटकांची संख्या वाढली. गेल्या वर्षभरापासून वन्यजीव विभाग पर्यटकांकडून शुल्क आकारणी करत आहे. गेल्या वर्षी सुमारे साडेपाच ते सहा लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. यावर्षी वळवाचा पाऊस लांबल्याने काजव्यांची उत्पत्ती जूनमध्ये झाली. त्यामुळे जून महिन्यापासून पर्यटकांचा कल भंडारदरा वनपरिक्षेत्रातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याकडे वाढला होता. या वनपरिक्षेत्रातील दहा गावांना रोजगाराच्या नवीन संधी व मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याकरिता ग्रामपरिस्थितीकीय विकास समितीमार्फत महसुलाच्या निम्मा निधी खर्च केला जाणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. डी. पडवळे यांनी सांगितले.गावकऱ्यांमुळे महोत्सव यशस्वीभंडारदरा वनपरिक्षेत्रातील अभयारण्यातील पेंडशेत, पांजरे, उडदवणे, शिंदणवाडी, घाटघर, मूतखेल, रतनवाडी, साम्रद, कोलटेंभे, पेरूगण या गावांना महसुलाचा लाभ होणार आहे. गावातील सोयीसुविधा तसेच रोजगाराचे पर्यायांवर महसुलाचा निम्मा भाग खर्च केला जाणार आहे. स्थानिक तरुणांना कॅम्पेनिंग निवासी तंबू, खाद्यपदार्थ विक्री स्टॉल्स पुरविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.गावकऱ्यांच्या परिश्रमामुळे तसेच आलेल्या पर्यटकांनी वनविभागाच्या नियमावलीचे गांभीर्याने पालन करण्याचा प्रयत्न केल्याने काजवा महोत्सव यशस्वी झाल्याचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी सांगितले. पावसाळी पर्यटनालाही सुरुवात झाली असून, हीदेखील गावकºयांच्या दृष्टीने उत्तम संधी असल्याचे अंजनकर म्हणाले. वर्षा सहलीकरिता येणारे शालेय विद्यार्थी वगळता अन्य पर्यटकांना प्रवेश शुल्क आकारून अभयारण्य क्षेत्रात प्रवेश दिला जाणार आहे.
काजवा महोत्सवातून साडेसात लाखांची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 01:43 IST
अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्यातील वृक्षराजीवर पावसाळापूर्व जून महिन्यात काजव्यांची चमचम अनुभवण्यासाठी ३० दिवसांत सुमारे ३० ते ३५ हजार पर्यटकांनी भेट दिली. पर्यटकांकडून मिळालेल्या वाहन व व्यक्तीच्या प्रवेश शुल्कापोटी नाशिक वन्यजीव विभागाला तब्बल ७ लाख ६४ हजार ६४० रुपयांची कमाई झाली.
काजवा महोत्सवातून साडेसात लाखांची कमाई
ठळक मुद्देनाशिक वन्यजीव विभाग : ३५ हजार पर्यटकांची कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याला भेट