अर्ली द्राक्ष पिकाला मिळाले विमा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 00:44 IST2021-06-20T23:35:29+5:302021-06-21T00:44:55+5:30

नाशिक : सरकारला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील कसमादेच्या अर्ली द्राक्ष पिकाला अखेर शासनाने यंदाच्या हंगामापासून पीक विम्याचे कवच लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेकडो द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Early grape crop got insurance cover | अर्ली द्राक्ष पिकाला मिळाले विमा कवच

अर्ली द्राक्ष पिकाला मिळाले विमा कवच

ठळक मुद्देकोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारी झाला

नाशिक : सरकारला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील कसमादेच्या अर्ली द्राक्ष पिकाला अखेर शासनाने यंदाच्या हंगामापासून पीक विम्याचे कवच लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेकडो द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, देवळा, कळवण या भागात सुमारे सहा हजार हेक्टर क्षेत्रावर अर्ली द्राक्ष पिकाची लागवड केली जाते. दरवर्षी हजारो टन द्राक्ष निर्यात होऊन शासनाला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळते. तसेच शेकडो बेरोजगारांना रोजगार देखील मिळतो. असे असताना या पिकाला विमा कवच देण्याबाबत शासन उदासीन होते. सलग गेल्या तीन वर्षांपासून अवकाळी आणि गारपीटमुळे द्राक्ष घेणारा टापूच धोक्यात येऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारी झाला असल्याची कैफियत शेतकऱ्यांनी शासनदरबारी मांडली होती. या पिकाला विमा कवच देण्याची आग्रही मागणी कृषीमंत्री दादा भुसे, कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याकडे करण्यात आली होती. याची दखल घेत कृषी आयुक्त धीरज कुमार यांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन सर्वेक्षण केले. त्यानुसार नुकताच शासनाने अर्ली द्राक्ष पिकाला यंदाच्या हंगामापासून तीन वर्षांसाठी विमा कवच लागू करण्याचा निर्णय घेतला असून तसा शासन निर्णय देखील लागू करण्यात आला आहे.

Web Title: Early grape crop got insurance cover