बाप्पाच्या आगमनाची आतुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:14 IST2020-08-19T21:21:32+5:302020-08-20T00:14:05+5:30
दिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली असून, कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी आपापल्या घरीच बाप्पाला विराजमान करण्यास पसंती दिली आहे.

बाप्पाच्या आगमनाची आतुर
लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली असून, कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी आपापल्या घरीच बाप्पाला विराजमान करण्यास पसंती दिली आहे.
यंदा कोरोना संसर्ग असल्यामुळे कुठलाही गाजावाजा न करता अगदी साध्या पद्धतीने गणपती बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता लखमापूर व परिसरात लागली आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी कोरोनाचे शासकीय नियम पाळून विविध मंडळे सज्ज झाली आहेत. विविध ठिकाणी फिजिकल डिस्टन्स्ािंगचे नियम पाळून जागोजागी वेगवेगळ्या आकाराच्या बाप्पाच्या मूर्तीची दुकाने सजली आहेत.
सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी जनतेचा कौल वाढला आहे. महाराष्टÑाचे आराध्यदैवत व विघ्नहर्ता गणपतीबाप्पाच्या आगमनाची तयारी म्हणजे सध्या संपूर्ण देशात व विविध प्रांतात कोरोनाने आपले रौद्र रूप धारण केले आहे.सजावट साहित्याची वाढती मागणीबाप्पा विराजमान करून कोरोनाचे हे संकट जाईल, अशी प्रार्थना करून अनेक मंडळे त्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. ही भावना मनात ठेवून बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली आहे. यंदा बाप्पाचे आगमन कुठलाही गाजावाजा न करता, कुठलीही मिरवणूक नाही. अगदी साध्या पद्धतीने करण्यावर प्रत्येक मंडळाने भर दिला आहे. यामुळे येत्या गणपती बाप्पाच्या स्थापनेपासूनच सामाजिक बांधिलकीची जाणीव कशी चांगल्या प्रकारे जोपासली यावर अनेकांचा भर आहे.
यंदा गणेश उत्सवावर अनेक बंधने आहेत. मोठ्या आकाराची मूर्ती नको, कुठलाही प्रकारचा गाजावाजा नाही. सोशल डिस्टन्सचे नियम असे अनेक नियम असल्यामुळे बºयाच नागरिकांनी आपापल्या घरीच बाप्पा विराजमान करण्याला पसंती दिली आहे.
यंदा कोरोनाचे वातावरण व्यापक असल्यामुळे आम्ही कुठलाही गाजावाजा न करता व शासकीय नियम पाळून दोन वेळेस आरती, प्रसाद करून तसेच कोरोनाविषयी जनजागृती, आरोग्य जनजागृती आदी मोठ्या प्रमाणावर भर देणार असल्याची प्रतिक्रिया गणेश भक्त मंडळांनी दिली आहे.
सध्या कोरोनामुळे सार्वजनिक मंडळांकडून स्थापना थोड्याफार प्रमाणात करण्यात येणार आहे.