शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नाशकातही होणार खरेदी-विक्री व्यवहारांची ई-नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 01:39 IST

मालमत्ता खरेदीनंतर त्यांची नोंदणी करणे सुलभ व्हावे यासाठी आता नाशकातील ग्राहकांना दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची गरज उरणार नाही. कारण मुंबई-पुण्यानंतर नाशकातही खरेदी- विक्री व्यवहारांची दस्तनोंदणी प्रक्रिया आता ऑनलाइन होणार असून, बिल्डरच्या कार्यालयातच व्यवहारांची दस्तनोंदणी करता येणार आहे.

ठळक मुद्देबांधकाम व्यावसायिकांचे प्रशिक्षण बिल्डरच्या कार्यालयातूनच ऑनलाइन प्रक्रिया शक्य

नाशिक : मालमत्ता खरेदीनंतर त्यांची नोंदणी करणे सुलभ व्हावे यासाठी आता नाशकातील ग्राहकांना दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची गरज उरणार नाही. कारण मुंबई-पुण्यानंतर नाशकातही खरेदी- विक्री व्यवहारांची दस्तनोंदणी प्रक्रिया आता ऑनलाइन होणार असून, बिल्डरच्या कार्यालयातच व्यवहारांची दस्तनोंदणी करता येणार आहे.

ऑनलाइन दस्तनोंदणीसंदर्भात नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे, सहजिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी नाशिक तसेच क्रेडाई नाशिक मेट्रो यांच्यातर्फे गुरुवारी (दि.२) संयुक्तरीत्या प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. मुंबई व पुणे या महानगरानंतर ई-नोंदणी सेवा उपलब्ध होणारे नाशिक हे राज्यातील तिसरे शहर ठरले असून, नोंदणी प्रक्रियेमध्ये होणाऱ्या निरंतर सुधारणांचा हा महत्त्वाचा भाग आहे. यापूर्वी प्रक्रिया पूर्णपणे मनुष्यबळाच्या मदतीने करण्यात येत होती. त्यानंतर याप्रक्रियेचे पूर्णपणे संगणकीकरण करण्यात आले असून, गुरुवारी सुरू करण्यात आलेली ई-रजिस्ट्रेशन सेवा या नोंदणी प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. त्यामुळे ग्राहकांना नोंदणीसाठी ताटकळत राहण्याची गरज उरणार नाही. मात्र ही सेवा देण्यासाठी ५०हून अधिक सदनिका, भूखंड, दुकाने अथवा कार्यालये असलेल्या बांधकाम व्यावसायिकांनाच उपलब्ध करून देता येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत प्रकल्पातील ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार असल्याचे ई-नोंदणी समन्वयक मनीष जाधव यांनी बांधकाम व्यावसायिकांना ई-नोंदणीसंदर्भात मार्गदर्शन करणात स्पष्ट केले. यावेळी क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल, क्रेडाईचे मानद सचिव गौरव ठक्कर, कार्यशाळेचे समन्वयक अतुल शिंदे, अनिल आहेर, सागर शहा तसेच क्रेडाई मॅनेजिंग कमिटी सदस्य उपस्थित होते. नरेंद्र कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

--

महाराष्ट्र शासनाची ई-रजिस्ट्रेशन सुविधा नाशिकमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक मालमत्तेची विक्री पश्चात नोंदणी त्याच्याच कार्यालयात करू शकतो. या सुविधेमुळे ग्राहकांना लाभ होणार असून, व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता येऊन गैरव्यवहारदेखील टाळता येणे शक्य होणार आहेत.

- कैलास दवंगे, मुद्रांक जिल्हाधिकारी

 

--

दिवसेंदिवस शहर विस्तारत असताना नवनवीन प्रकल्पात नोंदणी करण्यासाठी वाढीव पायाभूत सोयी -सुविधांची गरज ई-नोंदणी प्रक्रियेमुळे पूर्ण होणार आहे. तसेच ग्राहकांना आता कोणत्याही दिवशी म्हणजे अगदी सुटीच्या दिवशीही कोणत्याही वेळी नोंदणी करणे शक्य होणार आहे.

-रवि महाजन, अध्यक्ष, क्रेडाई नाशिक मेट्रो

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारHomeसुंदर गृहनियोजनonlineऑनलाइन