शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगमध्ये ई-बाइकचा स्फोट; ५ दुचाकी खाक! नाशिकमध्ये मध्यरात्री घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 05:37 IST

पाथर्डी फाटा येथील आनंदनगर भागात अपार्टमेंटच्या वाहनतळात मध्यरात्री दीड वाजेच्यासुमारास इलेक्ट्रिक बाइकचा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नाशिक : पाथर्डी फाटा येथील आनंदनगर भागात अपार्टमेंटच्या वाहनतळात मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्यासुमारास इलेक्ट्रिक बाइकचा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. अन्य पाच दुचाकीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.  सर्व रहिवासी गाढ झोपेत असताना मध्यरात्री एकापाठोपाठ आवाज झाले व रहिवासी खडबडून जागे झाले. खिडक्या, बाल्कनीमध्ये येऊन डोकावले असता त्यांना   वाहनतळात जास्त प्रकाश आणि धुराचे लोट उठत असल्याचे दिसले.

आठ महिन्यांपूर्वी दुचाकीची खरेदी

वाल्मिक पाटील यांनी ८ महिन्यांपूर्वीच इलेक्ट्रिक बाइक खरेदी केली होती. त्यांनी नेहमीप्रमाणे ही बाईक वाहनतळात उभी केली. अचानक त्यांच्या बाईकचा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. यामुळे अन्य रहिवाशांच्या पाच दुचाकीही जळून राख झाल्या.

धावत्या इलेक्ट्रिक बाइकने घेतला पेट

शिवथर (जि. सातारा) : आरळे (ता. सातारा) येथील पेट्रोलपंपानजीक धावत्या इलेक्ट्रिक बाइकला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात ही बाइक पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्यासुमारास घडली. जयवंत आनंदराव साबळे यांची तुनवाल या कंपनीची इलेक्ट्रिक बाईक असून, या बाइकला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. ही बाइक घेऊन त्यांचा मुलगा ओम साबळे हा साताऱ्याला जात होता. पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर बाइकमधून अचानक धूर येऊ लागल्याचे त्याच्या लक्षात आले. बाइक रस्त्याच्या बाजूला घेईपर्यंत बाइकने अचानक पेट घेतला.     

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर