शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील दवंडी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 23:58 IST

चांदोरी : पूर्वी शासकीय असो की निमशासकीय, कुठलाही कार्यक्रम असल्यास दवंडी देऊन ग्रामस्थांना निमंत्रण देण्याची परंपरा होती. काळानुसार दवंडीची प्रथा आता हद्दपार झाली आहे. दवंडीच्या जागी आता मोबाइलवरील ग्रुपवर मेसेज पाठवून कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे गटातील दवंडीचा आवाज ऐकावयास मिळत नाही.

ठळक मुद्देग्रामपंचायतमधील कुठलाही व गावातील शासकीय कार्यक्रमाची सूचना दवंडी देऊनच कळवली जायची.

चांदोरी : पूर्वी शासकीय असो की निमशासकीय, कुठलाही कार्यक्रम असल्यास दवंडी देऊन ग्रामस्थांना निमंत्रण देण्याची परंपरा होती. काळानुसार दवंडीची प्रथा आता हद्दपार झाली आहे. दवंडीच्या जागी आता मोबाइलवरील ग्रुपवर मेसेज पाठवून कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे गटातील दवंडीचा आवाज ऐकावयास मिळत नाही.निफाड तालुक्यातील भरपूर गावात पूर्वीच्या काळात शासनाच्या योजनांची माहिती असो की ग्रामसभा, त्याचे जगजाहीरपणे दवंडी देऊन सूचना दिल्या जात असत. ग्रामपंचायतमधील कुठलाही व गावातील शासकीय कार्यक्रमाची सूचना दवंडी देऊनच कळवली जायची. त्यामुळे लोकांना घरपोच माहिती मिळायची. दवंडीचा आवाज आला की काहीतरी कार्यक्रम आहे हे निश्चित व्हायचे. तसेच योजनेची माहिती फॉर्म, भरण्याची सूचना, ग्रामसभा असल्याचेही समजत असे. परंतु या आधुनिक काळात हा प्रकार ग्रामीण भागात बंद पडल्यात जमा झाला आहे. दवंडीमुळे वाचासारखी गोष्ट प्रसारित होत होती. दवंडीच्या जागी आता कुठलाही कार्यक्रम असो शासकीय योजनांची माहिती, ग्रामसभेची सूचनाही सोशल मीडियाद्वारे ग्रुपवर टाकल्या जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात घुमणारा आवाज लुप्त झाला आहे.गावातील ग्रामसभेची सूचना दवंडीतून पूर्वी कळायची. त्यामुळे मोठी गर्दी असायची. वादळी चर्चा व्हायची तसेच जे नागरिक ग्रामसभेला हजर नसल्यास संबंधित व्यक्ती उपस्थित ग्रामसभेत काय झाले याची कुतूहलाने माहिती घ्यायचा. परंतु आता सोशल मीडियावर किंवा फलकावर ग्रामसभेच्या सूचना देऊ लागल्याने अनेकांना ग्रामसभेची माहिती पोहोचताना दिसत नाही. मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये ग्रामसभा होताना पाहावयास मिळत आहे. ग्रामसभेला महत्त्वप्राप्त झाले तरी लोकांच्या अनुउपस्थितीमुळे चर्चेविना ग्रामीण भागात ग्रामसभा होत आहे.ग्रामीण भागातील दवंडीचा प्रकार हद्दपार झालेला दिसतो.दवंडीतून प्रसारित होणारी माहिती वेगाने लोकांना समजायची; परंतु सोशल मीडियातून मोजक्या लोकांपर्यंत पोहोचताना दिसत आहे. विशेष म्हणजे या दवंडीची चर्चा गावभर व्हायची. त्यामुळेच कोणी दवंडी नाही ऐकली तरी संदेश मात्र मिळायचा आता प्रत्येकाकडे मोबाइल असला तरीही त्यातील संदेश वाचण्याइतकीही फुरसत कोणाला नसल्याचे चित्र हाहे.ऐका हो ऐका ...ग्रामीण भागातील दवंड्या ऐका हो ऐका असे म्हणत शासकीय योजनांची असो की, जनजागृती मोहीम त्याची दवंडी द्यायचा. त्यामुळे लोक थेट माहिती मिळत असल्याने लक्षपूर्वक ऐकायचे. काही प्रश्न असल्यास उपस्थित करायचे; परंतु आता दवंडीही ग्रामीण भागातून हद्दपार झाली आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRural Developmentग्रामीण विकास