द्वारका सांस्कृतिक केंद्र  आयोजित  ‘एक पुलकित सायंकाळ’ रंगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:30 IST2018-11-25T22:58:21+5:302018-11-26T00:30:04+5:30

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व प्रसिद्ध विनोदी साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त द्वारका सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आयोजित एक पुलकित सायंकाळ गीत आणि विनोदी किश्श्यात रंगली. या कार्यक्रमात अनेक नवोदित कलाकारांनी आपली कला सादर केली.

Durga Cultural Center organized a 'Pulakit Evening' | द्वारका सांस्कृतिक केंद्र  आयोजित  ‘एक पुलकित सायंकाळ’ रंगली

द्वारका सांस्कृतिक केंद्र  आयोजित  ‘एक पुलकित सायंकाळ’ रंगली

नाशिक : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व प्रसिद्ध विनोदी साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त द्वारका सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आयोजित एक पुलकित सायंकाळ गीत आणि विनोदी किश्श्यात रंगली. या कार्यक्रमात अनेक नवोदित कलाकारांनी आपली कला सादर केली.
गोळे कॉलनीत काका गद्रे मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात अशोक घैसास यांनी पु. ल. देशपांडे यांची भूमिका वटविली. त्यांची हेमंत चोपडे यांनी मुलाखत घेतली. त्यात घैसास यांनी पुलंच्या भूमिकेत दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी अंतू बर्बा या पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीमधील व्यक्तिरेखेचे सादरीकरण करण्यात आले.तसेच विविध कलाकारांनी नाच रे मोरा, हसले मनी चांदणे, कौशलेचा राम, इंद्रायणी काठी, शब्दा वाचून कळले सारे आदी गीते सादर केली. यावेळी सुधीर सराफ यांनी पुलंच्या जीवनातील आठवणी सांगितल्या. या कार्यक्रमात अरुणा सराफ, प्रा. हेमंत चोपडे, चित्रा हुदलीकर, रसिका काळगावकर, सतीश काळगावकर आदींनी सहभाग घेतला. त्यांना विनोद पटवर्धन यांनी तबला साथ दिली. अरुणा कुलकर्णी यांनी निवेदन सादर केले.

Web Title: Durga Cultural Center organized a 'Pulakit Evening'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक