सटाण्यात डम्परचे टायर फुटून अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 00:12 IST2020-12-28T20:20:37+5:302020-12-29T00:12:34+5:30
सटाणा : शहरातून टाटा कंपनीचे डम्पर नाशिककडे जात असताना अचानक टायर फुटल्याने गाडी शिवाजी महराज पुतळ्याजवळील राजस्थान स्विटजवळील गटारीत अडकली, यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने यात कोणतेही नुकसान झाले नसून, टायर फुटल्याच क्षणी हॉटेलजवळील गटारीत गाडी जाऊन आदळली. यामुळे संभाव्य होणारी मोठी दुर्घटना टळली.

सटाण्यात डम्परचे टायर फुटून अपघात
नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना कळविताच, सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गाडी बाहेर काढली. या घटनेमुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अनेक वेळा मोठे अपघात झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बायपास होण्याची मागणी होत आहे. मात्र, बायपास पूर्वेकडून व्हावा की पाश्चिमेकडून व्हावा, या राजकारणाच्या घोळात काम पूर्ण होत नाही. बायपासचे काम तत्काळ सुरू करण्याची मागणी नगरसेवक राहुल पाटील यांनी केली आहे.