डंपरची दुचाकीला धडक; दोघे तरुण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 01:39 IST2021-12-20T01:38:37+5:302021-12-20T01:39:23+5:30

रेडक्रॉस सिग्नलकडून रविवार कारंजाकडे विरुध्द बाजूने भरधाव जाणाऱ्या मालवाहू डंपरने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत.

Dumper hits two-wheeler; Both young serious | डंपरची दुचाकीला धडक; दोघे तरुण गंभीर

डंपरची दुचाकीला धडक; दोघे तरुण गंभीर

शिक : रेडक्रॉस सिग्नलकडून रविवार कारंजाकडे विरुध्द बाजूने भरधाव जाणाऱ्या मालवाहू डंपरने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. रेडक्रॉस चौकाकडून रविवार कारंजाकडे जाण्यासाठी बंदी आहे. 'नो एन्ट्री' असतानाही रात्रीची वेळ साधत वाहतूक नसल्याने रविवारी (दि.19) रात्री सव्वा 11 वाजेच्या सुमारास एका डंपरचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत त्याच्या ताब्यातील डंपरने(एम.एच.48 जे 2224) समोरील बाजूनेयेणाऱ्या ऍक्टिव्हा दुचाकी (एम.एच.15 जी.वाय 4874) ला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघे दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळून गंभीरपणे जखमी झाले. हा अपघात यशवंत मंडईजवळ झाला असून जखमींना तातडीने परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. जखमींची नावे समजू शकलेली नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Dumper hits two-wheeler; Both young serious