शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

डांबरीकरणाचे फुटले बिनआवाजी फटाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:27 AM

विरोधकांची चुप्पी : २६० कोटींच्या रस्ता डांबरीकरणाला विनाचर्चा मंजुरी नाशिक : कुठलाही आवाज नाही, कसलीही चर्चा न करता महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने रस्ता डांबरीकरणासाठी सुमारे २६० कोटी रुपयांच्या कामांना परस्पर मंजुरी देत वसुबारसलाच दिवाळीचे फटाके फोडण्याची किमया साधली. एरव्ही किरकोळ गोष्टींनी महासभेत गोंधळ घालत सत्ताधाºयांना जाब विचारणाºया विरोधकांनीही सोईस्कररीत्या चुप्पी तर साधलीच शिवाय, प्रशासनानेही त्याबाबत तत्परता दाखविल्याने एकूणच भूमिकेबद्दल संशयाचा धूर निघू लागला आहे.

विरोधकांची चुप्पी : २६० कोटींच्या रस्ता डांबरीकरणाला विनाचर्चा मंजुरी

नाशिक : कुठलाही आवाज नाही, कसलीही चर्चा न करता महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने रस्ता डांबरीकरणासाठी सुमारे २६० कोटी रुपयांच्या कामांना परस्पर मंजुरी देत वसुबारसलाच दिवाळीचे फटाके फोडण्याची किमया साधली. एरव्ही किरकोळ गोष्टींनी महासभेत गोंधळ घालत सत्ताधाºयांना जाब विचारणाºया विरोधकांनीही सोईस्कररीत्या चुप्पी तर साधलीच शिवाय, प्रशासनानेही त्याबाबत तत्परता दाखविल्याने एकूणच भूमिकेबद्दल संशयाचा धूर निघू लागला आहे.सोमवारी (दि.१६) झालेल्या महापालिकेच्या महासभेत भंगार बाजारावर तीन तास चर्चा चालली. आउटसोर्सिंगसह पाणीबिल वाटपाच्या मुद्द्यावर विरोधकांनी हरकती नोंदवल्या. जादा विषयांची पत्रिकाही महासभेत दाखलमान्य करून घेत त्यातील विकासकामांना मंजुरी देण्यात आली. मात्र, महासभेत सुमारे २६० कोटी रुपयांच्या रस्ता डांबरीकरणाचा पुन्हा घाट घातला गेला आहे, याची गंधवार्ताही कुणाला लागू न देता महापौरांनी सदरच्या कामांना मंजुरी दिली. गेल्या दोन-अडीच वर्षांत महापालिकेने रस्त्यांवर सुमारे ७०० कोटींहून अधिक रक्कम खर्च केलेली आहे.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे ४७५ कोटी रुपयांचे रस्ते करण्यात आले. त्यात रिंगरोडची कामे झाली. सिंहस्थात अंतर्गत रस्ते झाले नाही म्हणून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा १९२ कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे करण्याला मंजुरी देण्यात आली.सदर रस्त्यांच्या कामांचे पितळ शहरात झालेल्या पावसाने उघड केले. अद्यापही त्यातील बव्हंशी रस्त्यांवर दुसरा थर पडलेला नाही तर अनेक ठिकाणी डांबरीकरणाची कामेच झालेली नाहीत. आता याच पावसावर खापर फोडत पुन्हा एकदा सुमारे २६० कोटी रुपये खर्चाच्या रस्ता डांबरीकरणाचा घाट घातला गेला आणि सत्ताधाºयांच्या सुरात सूर मिसळत प्रशासनानेही तत्परता दाखवत प्रस्ताव तयार केला. विकासकामांचेच प्रस्ताव मंजूरमहासभा आटोपल्यानंतर पत्रकारांनी महापौर रंजना भानसी यांना २६० कोटी रुपयांच्या रस्ता डांबरीकरणाच्या कामांविषयी विचारणा केली असता, त्यांनी सदर विषय हे विकासकामांचे असल्याने मंजुरी दिल्याचे सांगितले. सदरचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेवर ठेवला होता. तो मागील दाराने मंजूर केला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सहाही विभागातील सर्वच प्रभागांमध्ये रस्त्यांची कामे केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.