शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आवक घटल्याने फळभाज्या कडाडलेल्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:52 IST

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात फळभाज्यांची निर्यात होत असल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतातील पिके नाश पावल्याने आवक काही प्रमाणात घटली आहे. एकीकडे आवक घटली तर दुसरीकडे बाजारभाव तेजीत आल्याने सर्वसामान्य ग्राहक हवालदिल झाले आहेत.

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात फळभाज्यांची निर्यात होत असल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतातील पिके नाश पावल्याने आवक काही प्रमाणात घटली आहे. एकीकडे आवक घटली तर दुसरीकडे बाजारभाव तेजीत आल्याने सर्वसामान्य ग्राहक हवालदिल झाले आहेत.बाजार समितीत वांगी, भोपळा, गिलके, दोडका, कारले, ढोबळी मिरची, टोमॅटो, या फळभाज्यांची आवक होत आहे. नाशिक बाजार समितीतून गुजरात राज्यात शेतमालाला मागणी वाढलेली असल्याने बाजारभावात तेजी निर्माण झालेली आहे. ढोबळी मिरची ३० रुपये प्रति किलो, लामडी वांगी ५० रुपये, दोडका ४० रुपये, भोपळा ३० रुपये नग, हिरवी वांगी ३५ रुपये, लाल वांगी ४० रुपये प्रति किलो असा बाजारभाव मिळत असल्याचे भाजीपाला व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले. पावसाने सध्या उघडीप दिलेली असली तरी नवीन फळभाज्या दाखल झाल्या नसल्याने बाजारभाव तेजीत आहे. याशिवाय नाशिकच्या बाजार समितीतून गुजरातला शेतमाल निर्यात केला जात असून, गुजरात राज्यात या शेतमालाला व्यापाºयांकडून उठाव अधिक असल्याने बाजारभाव सध्या तेजीत आहेत. आगामी काही दिवसांत सर्वच फळभाज्या मोठ्या प्रमाणात दाखल होण्याची शक्यता असल्याने बाजारभाव घसरण्याची शक्यता असल्याचे बाजारसमिती सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत किमान ४० रुपये प्रति किलो बाजारभाव असलेल्या फळभाज्या किरकोळ बाजारात व हातगाडीवर ग्राहकांना ७० ते ८० रुपये प्रति किलो दराने खरेदी कराव्या लागत असल्याने ग्राहकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.