शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

ओखी वादळाच्या सावटामुळे नाशिकच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली, पालकांनी सुरक्षिततेसाठी घेतली खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 8:45 PM

वादळाच्या प्रभावामुळे पाटेपासूनच सुरु झालेला रिमङिाम पाऊस आणि ढगाळ वातावणासोबतच थंडीचा प्रचंड कडाका जाणवत असल्याने अनेक पालकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना घरीच ठेवून घेतले.

ठळक मुद्देवादळाच्या प्रभावामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घटशहरात दिवसभर रिमझिम पावसासह ढगाळ वातावरण सुरक्षिततेचा उपाय म्हणून पालकांनी घेतली खबरदारी

नाशिक : कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक शहर व परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये घट दिसून आली. वादळाच्या प्रभावामुळे पाटेपासूनच सुरु झालेला रिमङिाम पाऊस आणि ढगाळ वातावणासोबतच थंडीचा प्रचंड कडाका जाणवत असल्याने अनेक पालकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना घरीच ठेवून घेतले. त्यामुळे शहरातील बहूतांश शाळांमध्ये 15 ते 20 टक्के विद्यार्थी गैरहजर राहिल्याचे दिसून आले.ओखी वादळाच्या प्रभावामुळे शहरातील वातावरणात अचानक झालेला बदल आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबई महानगरातील शाळांना जाहीर केलेली सुट्टी या मुळे नाशिकमधील शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या हजेरीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. तावडे यांनी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केली असली तरी हा संदेश सोशल मिडियातून वायरल झाल्यामुळे नाशिकच्याकाही पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सकाळच्या सुमारास आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांची संख्याही कमी होती. तर अनेक दांडी बहाद्दर विद्यार्थ्यांनी ढगाळ वातावरणाचा फायदा घेत शाळेला दांडी मारली. सकाळच्या सुमारास सुरु असलेला रिमझीम पाऊस आणि थंड हवेमुळे जाणवणारा गारठा यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी शाळेची तयारी करून घरीच राहणे पसंत केले. तर काही विद्यार्थ्यांनी चक्क शाळेच पोहोचल्यानंतरही पुन्हा घर गाठले. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. दरम्यान, ओखी वादळाच्या प्रभावामुळे दिवसभर शहरात रिमझिम पावसासह ढगाळ वातावरण व थंडीचे जाणवत असल्याने शहरातील बहूतांश शाळांनी खेळाच्या तासिका रद्द केल्या होत्या. त्यामुळे शाळांच्या आवारातही मुलांची उपस्थिती घटल्याचे दिसून येत होते.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळStudentविद्यार्थीSchoolशाळाRainपाऊस