विषय नसल्याने प्रभाग समितीची सभा तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:19 IST2019-01-29T00:19:08+5:302019-01-29T00:19:28+5:30
पंचवटी प्रभाग समितीच्या मासिक बैठकीत कोणतेही विषय पत्रिकेवर नसल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रभाग बैठक तहकूब केली. विषय पत्रिकेवर विषय येत नसल्याने प्रभाग समिती बरखास्त करावी, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली.

विषय नसल्याने प्रभाग समितीची सभा तहकूब
पंचवटी : पंचवटी प्रभाग समितीच्या मासिक बैठकीत कोणतेही विषय पत्रिकेवर नसल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रभाग बैठक तहकूब केली. विषय पत्रिकेवर विषय येत नसल्याने प्रभाग समिती बरखास्त करावी, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली.
सोमवारी पंचवटी विभागीय कार्यालय सभापती पूनम धनगर यांच्या अध्यक्षतेखाली प्रभागाची बैठक बोलविण्यात आली होती. विशेष म्हणजे या बैठकीला नगरसेवक रुची कुंभारकर, गुरुमित बग्गा, सुरेश खेताडे, कमलेश बोडके, अरुण पवार आदींसह केवळ सातच नगरसेवक उपस्थित होते. त्यातच विषय पत्रिकेवर कोणतेही विषय नसल्याने सभापती धनगर यांचे आगमन होताच नगरसेवकांनी विषय पत्रिकेवर विषय नाही. त्यामुळे प्रभाग बैठकीला कोणताही अर्थ नसल्याचे सांगून तत्काळ बैठक तहकूब करण्याची सूचना केली त्यानंतर लगेचच राष्ट्रगीताने बैठक तहकूब करण्यात आली.
प्रभागाच्या बैठकीत विषयपत्रिकेवर विषय येत नसल्याने प्रभागातील कामे करायची कशी, असा सवाल करत उपस्थित नगरसेवकांनी प्रभाग समिती बरखास्त करावी, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली.