लोकनेते पाटील प्रतिष्ठानमुळे शेतकऱ्यांची दिवाळी झाली गोड, लासलगावात 10 वर्षांपासून माफक दरात फराळ विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 16:52 IST2017-10-19T16:50:05+5:302017-10-19T16:52:14+5:30
लोकनेते दत्ताजी पाटील प्रतिष्ठानने सलग 10 व्या वर्षी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. लोकनेते पाटील प्रतिष्ठानतर्फे चिवडा, लसूण शेव, बारीक शेव, चकल्या, फरसाण, सोनपापडी, अनारसे, मोतीचूर लाडू, नानकटई, करंजी, म्हैसूरपाक आदी फराळाच्या पदार्थ्यांची माफक दरात विक्री केली जाते.

लोकनेते पाटील प्रतिष्ठानमुळे शेतकऱ्यांची दिवाळी झाली गोड, लासलगावात 10 वर्षांपासून माफक दरात फराळ विक्री
लासलगाव (नाशिक) : लोकनेते दत्ताजी पाटील प्रतिष्ठानने सलग 10 व्या वर्षी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. लोकनेते पाटील प्रतिष्ठानतर्फे चिवडा, लसूण शेव, बारीक शेव, चकल्या, फरसाण, सोनपापडी, अनारसे, मोतीचूर लाडू, नानकटई, करंजी, म्हैसूरपाक आदी फराळाच्या पदार्थ्यांची माफक दरात विक्री केली जाते. मध्यमवर्गीय, नोकरदार माणूस दिवाळी साजरी करत असताना लासलगाव परिसरातील कष्टकरी, कांदा उत्पादक शेतकरी मात्र दिवाळीतही कामात व्यग्र असतो. महिला शेतातील कामे करतात, त्यामुळे त्यांना दिवाळीचा फराळ करण्यासाठी वेळ मिळत नाही. साहजिकच येथे तयार फराळ घेण्यासाठी कष्टकरी, शेतकरी गर्दी करतात, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी सांगितले. येथे फराळ घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांबरोबरच शेजारच्या अहमदनगर, जळगाव व धुळे जिल्ह्यातूनही शेतकरी येथे मोठ्या संख्येने येतात.
सर्व फराळ 70 रुपये किलो!
बाजारात हा फराळ 125 ते 150 रुपये किलोने मिळतो. तोच फराळ येथे चक्क 70 रुपये किलोने मिळतो.