पाऊस रूसल्याने यंदा मराठवाड्याला तूर्त पाणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:18 IST2021-08-15T04:18:10+5:302021-08-15T04:18:10+5:30
चौकट=== गत वर्षापेक्षा तेरा टक्के कमतरता गेल्या वर्षी पावसाने सुरुवातीला दमदार हजेरी लावल्यानंतर मोठी विश्रांती घेतली हाेती. त्यानंतर मात्र ...

पाऊस रूसल्याने यंदा मराठवाड्याला तूर्त पाणी नाही
चौकट===
गत वर्षापेक्षा तेरा टक्के कमतरता
गेल्या वर्षी पावसाने सुरुवातीला दमदार हजेरी लावल्यानंतर मोठी विश्रांती घेतली हाेती. त्यानंतर मात्र जुलैच्या अखेरीस पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने गेल्या वर्षी ऑगस्टच्या मध्यान्हीपर्यंत जिल्ह्यात ६५ टक्के इतका पाऊस झाला होता. यंदाही हवामान खात्याने सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार, असे भाकीत केले असले तरी, प्रत्यक्षात पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्याच्या काळात फक्त ५३ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
चौकट===
८४ टक्क्याशिवाय आवर्तन नाही
नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या कराराचा विचार करता जायकवाडी धरण ६५ टक्के भरल्यास नाशिकमधून पाणी सोडण्याची गरज नाही, असे मेंढेकर समितीने म्हटले आहे; परंतु मराठवाड्यातही पावसाने वक्रदृष्टी केल्याने यंदा जायकवाडीत फक्त ४१ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे करारानुसार नाशिकमधून पाणी सोडावे लागणार असले तरी, जायकवाडीसाठी पाणी सोडताना नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ८४ टक्के जलसाठा असल्याशिवाय पाणी सोडता येणार नसल्याचे करारात नमूद आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ५६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जायकवाडीच नव्हे तर सिंचनासाठीदेखील तूर्त पाणी सोडण्यात येणार नाही.